पांडवकालीन प्रथा की अन्य काही...! नवविवाहितेला नवऱ्याच्या दोन भावांसोबतही राहण्याची सक्ती; सासू म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:21 IST2025-03-11T10:21:01+5:302025-03-11T10:21:43+5:30
एका नवविवाहितेला तिच्या सासुने तिन्ही मुलांसोबत राहण्यास भाग पाडले आहे. तसेच ती गर्भवती राहिल्याचे समजताच तिच्या पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार देत जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले आहे.

पांडवकालीन प्रथा की अन्य काही...! नवविवाहितेला नवऱ्याच्या दोन भावांसोबतही राहण्याची सक्ती; सासू म्हणते...
देशाच्या काही भागात आजही पांडवकालीन प्रथा सुरु आहे. एका भावाचे एका महिलेशी लग्न करून दिले जाते, तिच्यावर मात्र हक्क नवऱ्यासह सर्व भावांचा असतो. उत्तर प्रदेशमध्ये असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका नवविवाहितेला तिच्या सासुने तिन्ही मुलांसोबत राहण्यास भाग पाडले आहे. तसेच ती गर्भवती राहिल्याचे समजताच तिच्या पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार देत जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले आहे.
महिलांच्या अत्याचारात काही घट झालेली नाही. देशभरात ठिकाठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकताच एक प्रकार समोर आला आहे जो पांडवांची पत्नी द्रौपदीच्या कथेची आठवण करून देणारी आहे. या महिलेला केवळ हुंड्यासाठीच छळण्यात आले नाही तर तिचे शारिरीक शोषणही करण्यात आले आहे. नवऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवणे हे विवाहामध्ये सामान्य आहे, परंतू या महिलेला नवऱ्याच्या दोन भावांसोबतही शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले आहे.
जेव्हा या नवविवाहितेने यास नकार दिला तेव्हा तुला काही आम्ही एका मुलासाठी लग्न करून आणलेले नाही, तिघांसोबतही रहावे लागेल, असे तिच्या सासूने सांगितले आणि तिला हे सर्व करण्यासाठी भाग पाडण्यात आले. तिचा उपभोग तिन्ही भावांनी घेतला. जेव्हा तिला समजले की ती प्रेग्नंट राहिली आहे, तेव्हा तिने आपल्या पतीला सांगितले. परंतू पतीने ते मूल स्वीकारण्यास नकार दिला. भावांना तिच्या शरीराचे सुख घेण्यास संमती देणाऱ्या पतीने ते मुल आपले नाही, असे सांगत तिला गर्भपात करण्यास सांगितले. यास तिने नकार दिला तेव्हा तिला औषध भरवून गर्भपात करवला गेला.
पीडितेचे ६ मार्च २०२४ ला फतेहपूरमध्ये झाली होती. लग्नानंतर नवरा आणि दिरांनी तिच्याकडे कारची मागणी केली. तिच्या वडिलांनी असमर्थता दर्शविली. तेव्हा तिला शारिरीक त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेने न्यायालयात या अत्याचाराविरोधात दाद मागितली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. पती, सासू आणि दोन दिरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.