पंढरी गजबजली पत्राशेडपर्यंत दर्शन रांग : अधिक मासातील एकादशीचे औचित्य
By admin | Published: July 12, 2015 09:39 PM2015-07-12T21:39:57+5:302015-07-12T21:39:57+5:30
पंढरपूर : अधिक मासातील एकादशी कमला एकादशी म्हणून ओळखली जाते़ त्या निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी पंढरपुरात मोठी गर्दी केली होती.
Next
प ढरपूर : अधिक मासातील एकादशी कमला एकादशी म्हणून ओळखली जाते़ त्या निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी पंढरपुरात मोठी गर्दी केली होती.एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक पंढरीत दाखल झाले होते. त्यातच एकादशी रविवारी सुटीच्या दिवशी आल्यामुळे गर्दी अधिकच वाढली होती. सकाळी दर्शन मंडपाचे आठ गाळे भरून दर्शन रांग पत्र्याच्या दुसर्या शेडपर्यंत गेली होती. परंतु दुपारी दोननंतर ही गर्दी कमी होऊन दर्शन मंडपाच्या चार गाळ्यांपर्यंत दर्शन रांग आली. यंदा पावसाने ओढ दिल्याने चंद्रभागेत पाणी नाही. त्यामुळे डबक्यातच भाविकांना स्नान करावे लागत होते.गर्दी पाहून पोलीस प्रशासनाकडून वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये ५ पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड असा फौजफाटा लावण्यात आला होता, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव यांनी दिली.