पालकमंत्रीपदी पांडुरंग फुंडकर निश्चित ध्वजारोहण मात्र गुलाबराव पाटील करणार
By admin | Published: August 7, 2016 12:41 AM2016-08-07T00:41:53+5:302016-08-07T00:41:53+5:30
जळगाव : जळगाव जिल्ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निित झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
Next
ज गाव : जळगाव जिल्ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निित झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेले जळगाव जिल्ाचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. या पदावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र फुंडकर यांचे नाव निित झाले आहे. गटबाजीने बाहेरील व्यक्तीस संधीजिल्हा भाजपातील गटबाजी सर्वश्रुत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना न देता बाहेरील मंत्र्याला दिले जाण्याची शक्यताही पक्षातील काही जणांकडून वर्तविली जात होती. खडसे व महाजन यांच्यात मध्यस्ती करू शकेल अशी व्यक्ती पालकमंत्री असावी, खडसे समर्थक गटालाही नवीन पालकमंत्री विश्वासात घेऊ शकेल असे नेतृत्व पक्षाकडून शोधले जात होते. पक्षातील ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांना नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात खडसेंकडे असलेले कृषी खाते देण्यात आले व आता त्यांच्याकडे असलेले जळगाव जिल्ाचे पालकमंत्रीपदही फुंडकर यांच्याचकडे असेल. फुंडकर यांच्या नियुक्ती संदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. १५ ऑगस्ट नंतर फुंडकर हे जळगावी येण्याची शक्यता आहे. ध्वजारोहण गुलराबरावांच्या हस्ते पालकमंत्रीपदी फुंडकरांची नियुक्ती झाली असली तरी या वेळचे १५ ऑगस्टचे ध्वजारोहण हे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. फुंडकर यांच्या हस्ते बुलढाणा येथील ध्वजारोहण होणार आहे. ----जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना मिळाली आहे. त्या संदर्भातील शासनाचे आदेश सोमवारी मिळतील. - पांडुरंग फुंडकर, कृषी मंत्री.