पनीरसेल्वम गटाचा भाजपला पाठिंबा

By admin | Published: May 20, 2017 01:04 AM2017-05-20T01:04:23+5:302017-05-20T01:04:23+5:30

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अद्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी भेट

Paneerselvam group support for BJP | पनीरसेल्वम गटाचा भाजपला पाठिंबा

पनीरसेल्वम गटाचा भाजपला पाठिंबा

Next

- हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अद्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी भेट घेऊन राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देऊ केला. आपल्या पक्षाचे दहा खासदार आणि नऊ आमदार भाजप उमेदवाराला मत देतील, असे त्यांनी मोदींना सांगितले. ओ. पनीरसेल्वम यांनी मोदींची भेट घेतली. तेव्हा डॉ. व्ही. मैत्रेयन, के. पलानीसामी आणि माजी खासदार मनोज पांडियान त्यांच्यासोबत होते. ओपीएस यांनी पंतप्रधानांशी राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर समोरासमोर चर्चा केली. ओपीएस गटाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देऊ करणाऱ्या प्रादेशिक पक्षांची संख्या तीनवर गेली आहे. वायएसआर काँग्रसचे जगनमोहन रेड्डी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे तर तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी आपण केंद्राच्या बाजूने असल्याचे सांगून भाजपाला पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. अद्रमुकच्या सत्ताधारी गटाचे नेते आणि मुख्यमंत्री ई पलानीसामी हे भाजपाला पाठिंबा देण्यास तयार आहेत.

Web Title: Paneerselvam group support for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.