२०१७ पासून मोबाईल फोनमध्ये पॅनिक बटण बंधनकारक

By admin | Published: April 26, 2016 09:51 AM2016-04-26T09:51:52+5:302016-04-26T09:51:52+5:30

पुढच्यावर्षी एक जानेवारी २०१७ पासून भारतात विकल्या जाणा-या सर्व मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आले आहे.

Panic binding in mobile phone from 2017 | २०१७ पासून मोबाईल फोनमध्ये पॅनिक बटण बंधनकारक

२०१७ पासून मोबाईल फोनमध्ये पॅनिक बटण बंधनकारक

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २६ - पुढच्यावर्षी एक जानेवारी २०१७ पासून भारतात विकल्या जाणा-या सर्व मोबाईल फोन्समध्ये पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आले आहे. अडचणीत असताना तात्काळ इर्मजन्सी कॉल करता यावा यासाठी हे पॅनिक बटण असणार आहे.
 
त्यानंतर एक जानेवारी २०१८ पासून सर्व मोबाईलमध्ये दिशादर्शक जीपीएस यंत्रणेची सुविधाही बंधनकारक करण्यात आली आहे. 
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे.
 
खास करुन महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पॅनिक बटण बंधकारक करण्यात आले आहे. एक जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटण नसेल तर, विक्रेत्याला मोबाईल फोनची विक्री करता येणार नाही. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनिक बटण दाबल्यानंतर संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचा संदेश काही लोकांपर्यंत जाईल. 
 

Web Title: Panic binding in mobile phone from 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.