विमान हवेत असताना 'तो' अचानक उठला, विमानात दहशतवादी असल्याचं म्हणत ओरडू लागला अन्...
By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 11:41 AM2020-10-23T11:41:40+5:302020-10-23T11:41:59+5:30
विमान गोव्यात उतरताच प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं
नवी दिल्ली: एका प्रवाशानं विमानात दहशतवादी असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडला. मानसिक आजाराची पार्श्वभूमी असलेला एक प्रवासी दिल्लीहून गोव्याला निघाला होता. विमान हवेत असताना त्यानं दहशतवादी लपून बसल्याचा दावा केला. त्यामुळे सगळेच प्रवासी घाबरले.
विमानात दहशतवादी असल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाचं नाव झिया उल हक असं आहे. तो दिल्लीचा रहिवासी आहे. आपण दिल्ली पोलीस दलाच्या स्पेशल सेलमध्ये काम करत असल्याचा दावा त्यानं केला. एअर इंडियाचं विमान गोव्यातल्या विमानतळावर उतरताच त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
A mentally unsound passenger travelled by Air India yesterday from Delhi to Goa. He created a ruckus during flight and violated the on-board rules. He was handed over to Goa Airport police as the matter is related to law and order: Director, Goa Airport
— ANI (@ANI) October 23, 2020
गुरुवारी एअर इंडियाच्या विमानानं दिल्लीहून गोव्यासाठी प्रयाण केलं. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता झिया उल हक नावाचा प्रवासी अचानक स्वत:च्या आसनावरून उठला आणि विचित्र वर्तन करू लागला. या विमानात दहशतवादी आहेत. मी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातला अधिकारी आहे, असं तो सांगू लागला. यामुळे विमानातल्या इतर प्रवाशांची चिंता वाढली.
विमान गोव्यात उतरताच झिया उल हकला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी हकची चौकशी सुरू केली. त्याच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. त्यांनी हकला मानसिक आजार असल्याचं सांगितलं.