पालखीदरम्यान वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

By Admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:35+5:302015-07-10T23:13:35+5:30

पुणे : वारक-यांनी पालखीमार्गावरची दुतर्फा वाहतूक बंद करण्याची मागणी केल्यामुळे वाहतूक पोलिसांना अचानक काही रस्त्यांवर वाहतूकीमध्ये बदल करावे लागले. यामुळे शहरातील मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. संचेती रुग्णालय चौक आणि सिमला ऑफीस चौकातील वाहतूक पोलिसांना अचानक पुर्णपणे बंद करावी लागली. वारक-यांच्या या भुमिकेचा फटका मात्र सामान्य पुणेकरांना बसला.

Pankhikar Hairan due to traffic jam during Palakkhi | पालखीदरम्यान वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

पालखीदरम्यान वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण

googlenewsNext
णे : वारक-यांनी पालखीमार्गावरची दुतर्फा वाहतूक बंद करण्याची मागणी केल्यामुळे वाहतूक पोलिसांना अचानक काही रस्त्यांवर वाहतूकीमध्ये बदल करावे लागले. यामुळे शहरातील मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. संचेती रुग्णालय चौक आणि सिमला ऑफीस चौकातील वाहतूक पोलिसांना अचानक पुर्णपणे बंद करावी लागली. वारक-यांच्या या भुमिकेचा फटका मात्र सामान्य पुणेकरांना बसला.
वाहतूक पोलिसांनी पालखी आगमनासाठी वाहतूक वळवली होती. परंतु ऐनवेळी झालेल्या बदलामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दुपारी सिमला ऑफीस चौक बंद करण्यात आल्यानंतर वाहनांचा लांबच लांब रांगा महापालिका भवनापर्यंत आलेल्या होत्या. यासोबतच शनिवारवाड्यापासून ते शनिपारापर्यंतचा बाजीराव रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी महत्वाच्या चौकांमध्ये अडथळे (बॅरिगेट्स) निर्माण करुन वाहतूक थांबवलेली होती. वाहनचालक मात्र बराच वेळ या अडथळ्यांसमोरच वाहने लावून उभे होते.
तर काही वाहनचालक गल्ली बोळामधून वाट शोधत वाहन दामटत असल्याचे चित्र दिवसभर पहायला मिळाले. यासोबतच पुणे नगर रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, स्वारगेट चौक, नेहरु रस्ता, सोलापूर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. रात्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वराच्या पालख्या जसजशा पुढे सरकत होत्या. वाहतूक पोलिसांनी तसतसा पाठीमागून रस्ता खुला करुन द्यायला सुरुवात केली होती. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा मात्र संताप होत होता. अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची आणि वाहनचालकांची तुतुमैमै होत होती.

Web Title: Pankhikar Hairan due to traffic jam during Palakkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.