कडक सॅल्यूट! शेतात काम करणाऱ्या आईला DSP लेक भेटायला आला, वर्दीत पाहून आई भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:07 PM2023-02-28T17:07:48+5:302023-02-28T17:08:17+5:30
पोलीस अधिकारी होण्याच स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, घरचेही यासाठी कष्ट करत असतात. कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे समाधान जास्त असते, अशीच एक बातमी समोर आली आहे.
पोलीस अधिकारी होण्याच स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, घरचेही यासाठी कष्ट करत असतात. कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे समाधान जास्त असते, अशीच एक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे घाटीगाव एसडीपीओ संतोष पटेल यांच्या संदर्भात ही बातमी आहे. संतोष पटेल यांची गुन्हेगारांवर कारवाई करण्याची आणि लोकांना जागरूक करण्याची कठोर वृत्ती लोकांना खूप आवडली आहे. संघर्षातून झगडत संतोष पटेल पहिल्यांदा वनरक्षक आणि त्यानंतर पोलीस अधिकारी झाले. ५ वर्षांनंतर संतोष पहिल्यांदाच गणवेश घालून गावी आले आहेत. आई घरी नसताना एक अधिकारी आपल्या आईला भेटण्यासाठी शेतात गेला. यावेळी आईच्या चेहऱ्यावरचे समाधान तसेच हा भावूक क्षण व्हायरल झाला आहे.
शेतात त्यांची आई म्हशीसाठी चारा कापत होती. यादरम्यान, आई आणि मुलामध्ये जिव्हाळ्याचा संवाद झाला. डीएसपी संतोष पटेल यांनी आईसोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. गेल्या ४८ तासांत ८० लाखांहून अधिक लोकांनी आई-मुलाच्या संभाषणाचा व्हिडिओ पाहिला आहे.
डीएसपी संतोष पटेल आजकाल सतत चर्चेत असतात. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर तीन दिवसांपूर्वी ते सतना येथे कर्तव्यावर होते. तेथून परतत असताना संतोष यांनी गणवेशात पन्ना जिल्ह्यातील देव गाव गाठले. आई घरी नसताना संतोष आईला भेटण्यासाठी शेतात पोहोचले. गणवेशातील डीएसपी संतोष आणि त्यांच्या आईचे मातृभाषेत संभाषण झाले. संतोष यांनी जेव्हा या संभाषणाचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला, तेव्हा ४८ तासांत ८० लाखांहून अधिक लोकांनी हे संभाषण पाहिले आणि लाईक केले. हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला.
Highway: 'हायवे, एक्सप्रेस वे अन् ग्रीनफील्ड' महामार्गातील फरक, घ्या जाणून
संतोष पटेल यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'डीएसपी बनून पाच वर्षे झाली आहेत, जेव्हा मी पहिल्यांदा गणवेशात आईला भेटण्यासाठी शेतात पोहोचले होते. त्यांचा मातृभाषेतील संवादही व्हायरल झाला आहे.
संतोष पटेल यांचे बालपण संघर्षात गेले. पन्ना जिल्ह्यातील देवगाव येथे राहणारे संतोष त्याच गावातील सरकारी शाळेत शिकत असे. पुढ त्यांना उत्कृष्ट शाळेत पन्ना येथे प्रवेश मिळाला. येथून दहावी आणि बारावी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी उत्तीर्ण करून भोपाळमधून सिव्हिल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याबाबत गावकरी संतोषला टोमणे मारायचे. दरम्यान, संतोष यांना वनरक्षकाची नोकरी लागली. वनरक्षकाची नोकरी असताना जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. अखेर २०१८ साली संतोष यांची पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाली.