पपईने केलं लखपती! तरुण शेतकरी झाला मालामाल; एका महिन्यात कमावतो 1.25 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:50 PM2023-05-18T12:50:52+5:302023-05-18T12:56:52+5:30

कमी खर्चात चांगला नफा देणारी शेती तरुणाने YouTube च्या माध्यमातून पाहिली. यावेळी तरुण शेतकऱ्याला पपई लागवडीची माहिती मिळाली.

papaya made him rich samastipurs young farmer earns 125 lakh per month get to know him | पपईने केलं लखपती! तरुण शेतकरी झाला मालामाल; एका महिन्यात कमावतो 1.25 लाख

पपईने केलं लखपती! तरुण शेतकरी झाला मालामाल; एका महिन्यात कमावतो 1.25 लाख

googlenewsNext

सुशिक्षित तरुणही आता शेतीकडे वळू लागले आहेत. अनेक तरुणांनी शेतीचे रूपांतर नफ्यात केले आहे. बिहारच्या उजियारपूरमधील गाऊपूर पंचायतीचे तरुण शेतकरी पपईची लागवड करून दरमहा 1.25 लाख रुपये कमवत आहेत. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्याने कृषी क्षेत्रात येण्यासाठी आपल्या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. 

कमी खर्चात चांगला नफा देणारी शेती तरुणाने YouTube च्या माध्यमातून पाहिली. यावेळी तरुण शेतकऱ्याला पपई लागवडीची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने पपईची लागवड सुरू केली. आता त्याला पपईच्या लागवडीतून महिन्याला 1.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेतकरी मुरली मनोहर सिंहने दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये पहिल्यांदा शेतात पपईची लागवड सुरू करण्यात आली. त्या काळात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. पण 

2021 मध्ये पुन्हा पीक लावले. त्या दरम्यानही फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर  2022 मध्ये त्याने पपईची 500 रोपे लावली होती, ज्यातून आता महिन्याला 1.25 लाख रुपये कमवत आहेत. यासोबतच शेतकऱ्याने पपईच्या शेतात मोकळ्या जागेत झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. जे पपई पिकाच्या सुधारण्याबरोबरच नफाही देते.

तरूण शेतकरी सांगतो की, जेव्हा आम्ही पपईची शेती सुरू केली आणि पपई पिकायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात फळे विकण्यासाठी बाजारात जावे लागले. मात्र त्या काळात बाजारात योग्य भाव न मिळाल्याने आम्हाला खूप त्रास व्हायचा. पण आता व्यापारी शेतात येतात. पिकलेली पपई स्वतःहून काढून घेतात.

शेतात बाजारापेक्षा भाव जास्त आहे. बाजारात जाण्याचा खर्चही वाचतो. यासोबतच पपई बागायती ही व्यावसायिक शेती म्हणून ओळखली जाते, असे त्याने सांगितले. ज्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चात चांगला नफा मिळतो. याचाच परिणाम म्हणून आज तरुण शेतकरी मुरली मनोहर सिंह 1.30 लाख रुपये गुंतवून दरमहा 1.25 लाख रुपये कमवत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: papaya made him rich samastipurs young farmer earns 125 lakh per month get to know him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.