नोटा बनवण्यासाठी भारताला 'या' कंपन्या पुरवणार कागद

By admin | Published: December 25, 2016 07:49 PM2016-12-25T19:49:24+5:302016-12-25T19:49:24+5:30

मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर आता नव्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

Paper will provide 'these' companies to India to make currency notes | नोटा बनवण्यासाठी भारताला 'या' कंपन्या पुरवणार कागद

नोटा बनवण्यासाठी भारताला 'या' कंपन्या पुरवणार कागद

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर आता नव्या नोटा छापण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जगातील आठ मोठ्या कंपन्या भारताला नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदांचा पुरवठाही करणार आहेत. एप्रिल 2017 पासून या कंपन्या भारताला नोटांसाठी कागदाचा पुरवठा करतील, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

27, 500 मेट्रिक टन कागद भारताला मिळणार असून, यातून छोट्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. यात 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. जास्त मूल्याच्या म्हणजे 500 व 2 हजार रुपयांच्या नोटांसाठीचा कागद भारत स्वत:च तयार करणार आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ नोट मुद्रण प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात करार झाला असून, यासाठी स्वित्झर्लंडमधील लँकार्ड, दक्षिण कोरियाची कोमस्को, फ्रान्सची अ‍ॅरोगिनीस, स्वीडनची क्रेन, रशियाची गोझन्क, इंडोनेशियाची पीटी प्युरा, इटलीची फेब्रियानो आणि जर्मनीच्या लुईसेन्थल या कंपनीचे अधिकारी भारतात आले होते.

ब्रिटनच्या डी. ला. रू कंपनीला यावेळी डावलण्यात आले आहे. एक दशकाहून अधिक काळ डी. ला. रू ही कंपनी भारताला नोटा छपाईसाठी कागद पुरवत आली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव 2010-11 मध्ये भारतानं या कंपनीकडून कागद घेणे बंद केले होते. या कंपनीला गृह मंत्रालयाकडून प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.  दरम्यान, नोटाबंदीमुळे ख्रिसमसपूर्वीच हे मोठे काम देण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात चलनाचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नोटा छापण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

Web Title: Paper will provide 'these' companies to India to make currency notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.