प. बंगालचे नाव ‘बांग्ला’ करण्यास केंद्राचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:25 AM2018-11-15T07:25:02+5:302018-11-15T07:26:13+5:30
प. बंगालचे विधिमंडळ कामकाजमंत्री पार्थ चटर्जी म्हणाले की, केंद्राने ‘बांगला’ नावाचा प्रस्ताव परत पाठवावा, हे आश्चर्यकारक आहे,
कोलकाता : पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बांग्ला’ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर न करता परत पाठविताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याला ‘पश्चिमबंगा’ असे पर्यायी नाव सुचविले. ‘पश्चिमबंगा’ हे राज्यातील भाजपाच्या पसंतीचे नाव आहे. ‘बांगला’ या नावात बांग्लादेश या देशाच्या नावाशी साधर्म्य असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने त्यास आक्षेप घेतला.
प. बंगालचे विधिमंडळ कामकाजमंत्री पार्थ चटर्जी म्हणाले की, केंद्राने ‘बांगला’ नावाचा प्रस्ताव परत पाठवावा, हे आश्चर्यकारक आहे, कारण हे नाव केंद्र सरकारनेच सुचविले होते. केंद्राचा यामागचा हेतू साफ नसावा, असे वाटते व नाव बदलाच्या आडून ते राजकारण करू पाहत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रदेश भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, ‘बांग्ला’ हे नाव फाळणीचा काळाकुट्ट इतिहास झाकणारे आहे.