प. बंगालमध्ये महिला प्रवाशांनी रोखल्या रेल्वे
By admin | Published: August 19, 2015 10:48 PM2015-08-19T22:48:08+5:302015-08-19T22:48:08+5:30
केवळ महिलांसाठी रेल्वे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महिला प्रवाशांनी बुधवारी सकाळी पाच रेल्वेस्थानकांवर रेल्वे अडवून धरल्या होत्या.
बरासत (पश्चिम बंगाल) : केवळ महिलांसाठी रेल्वे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महिला प्रवाशांनी बुधवारी सकाळी पाच रेल्वेस्थानकांवर रेल्वे अडवून धरल्या होत्या.
या आंदोलनामुळे सकाळी १० वाजेपासून पूर्व रेल्वेच्या सिलडाह-कृष्णनगर विभागातील मध्यमग्राम, दत्तापुकूर, बिराती, बामनगच्ची आणि हृदयपूर रेल्वे स्टेशनवरील मार्ग जवळपास १ ते २ तास बंद पडले होते, असे रेल्वेचे प्रवक्ते राबी महापात्र यांनी सांगितले. त्यानंतर जीआरपींनी त्या महिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पुरेशा महिला प्रवासी नसल्यामुळे रेल्वेने बरासात-सिलडाह मातृभूमी लेडीज स्पेशल रेल्वेचे तीन डबे ‘जनरल’ असल्याचे १५ आॅगस्ट रोजी जाहीर केले होते. या निर्णयामुळे खरदा रेल्वेस्थानकात १७ आॅगस्ट रोजी प्रवाशांच्या दोन गटांत वाद झाला व त्यात सहा जीआरपी व पोलीस जखमी झाले. जीआरपी आणि पोलिसांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. (वृत्तसंस्था)