प. बंगालमधील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट

By admin | Published: April 22, 2016 03:11 AM2016-04-22T03:11:14+5:302016-04-22T03:11:14+5:30

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागांसाठीच्या गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मार्क्सवादी पक्षाचा पाठीराखा ठार झाल्यामुळे गालबोट लागले

Par. Violence against voting in Bengal | प. बंगालमधील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट

प. बंगालमधील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट

Next

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या ६२ जागांसाठीच्या गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मार्क्सवादी पक्षाचा पाठीराखा ठार झाल्यामुळे गालबोट लागले. याच पक्षाचे चार कार्यकर्ते जखमीही झाले. या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात झाले. दरम्यान राज्यात ७९.२२ टक्के मतदानाची नोंद झाली.
बर्दवानमधील १६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक तर कोलकात्यात सर्वांत कमी मतदान नोंदले गेले. नाडिया आणि मुर्शिदाबादमध्येही बऱ्यापैकी मतदान झाले.
बर्दवानमध्ये केंद्रप्रमुख मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार पोलिंग एजंटस्ने केल्यानंतर त्याला तेथून हटविण्यात आले. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना कोलकात्यातील जोरासँको मतदारसंघात मतदान केंद्रावर ते आईसह मतदानासाठी गेले असताना त्यांना अनेक प्रश्न विचारून त्रासून सोडण्यात आले, असा आरोप होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी तेथे सुरक्षा दले पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली, असे सांगितले.
माकपचा (एम) पाठीराखा तहिदूर इस्लाम (३५) याचा मृतदेह दोमकल विधानसभा (जि. मुर्शिदाबाद) मतदारसंघाच्या शिबापाडा मतदान केंद्रापासून ५०० मीटरवर आढळला. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसचे नेते अन्वर खान यांना मुख्य निवडणूक अधिकारी सुनील गुप्ता यांच्या सूचनेवरून अटक करण्यात आली. दूरचित्रवाणी वाहिनीवर खान पक्ष कार्यकर्त्यांशी फोनवर बोलत असताना निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरताना आढळले होते. केतुग्राम मतदारसंघात स्वतंत्र घटनेत चार कायकर्ते जखमी झाले. मतदान क्रमांक ७८ वर झालेल्या झटापटीत माकपच्या (एम) कार्यकर्त्याचा कान कापला गेला, तर दुसऱ्याचा पाय मोडला. मतदान केंद्र क्रमांक ४८ वर माकपचे दोन कार्यकर्ते त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आल्यानंतर जखमी झाले.
माकपचे (एम) उमेदवार व माजी मंत्री अनिसूर रहमान यांनी दावा केला की, आमचा कार्यकर्ता तहिदूर इस्लाम हा मतदान केंद्राबाहेर फेकल्या गेलेल्या बॉम्बमध्ये ठार झाला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सी. सुधाकर यांनी हा खून निवडणुकीशी संबंधित नसल्याचे सांगितले. डाव्या पक्षांनी तहिदूर इस्लामच्या हत्येबद्दल तृणमूल काँग्रेसवर ठपका ठेवला असून, तो पक्ष मतदारांना भीती घालण्यासाठी दहशत निर्माण करीत असल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)

Web Title: Par. Violence against voting in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.