भाजप ५०० जागा जिंकेल,BJP'ने जनावरं उभी केली तरी निवडून येतील: परमहंस आचार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:46 PM2024-03-08T14:46:48+5:302024-03-08T14:51:49+5:30
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादीही समोर आली आहे.
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादीही समोर आली आहे. दरम्यान, अयोध्येतील तपस्वी छावणीचे प्रमुख परमहंस आचार्य यांनी भाजपच्या विजयाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. बाराबंकी येथे जगतगुरू परमहंस आचार्य यांनी या निवडणुकीत भाजप ५०० हून अधिक जागा जिंकेल असा दावा केला.
जगतगुरू परमहंस आचार्य म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने खूप वेगाने प्रगती केली आहे आणि आपले सर्व देशवासी मोदीजींवर खूश आहेत. यावेळी मतदान मोदींच्या नावावर होणार आहे. भाजपकडून माणूस सोडा एखाद्या जनावराला जरी उभे केले तरी त्याचा विजय होईल, जिंकेल कारण आता जनता फक्त कमळाचे बटण दाबेल. लोकप्रतिनिधी कोण आहे किंवा तो कसा आहे याने काही फरक पडत नाही. इथे मोदीजींच्या नावावरच मतदान होणार आहे, असंही आचार्य म्हणाले.
सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन
"यावेळी होणारी निवडणूक हे खरे तर एक प्रकारचे वैचारिक महाभारतच आहे. महाभारत घडले तसे देशाचे दोन तुकडे झाले. काही लोक अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते. काही लोक धर्माच्या बाजूने उभे राहिले. ज्याची विचारधारा समान आहे. ज्यांना आपला देश पुढे न्यायचा असेल, ज्यांना लोककल्याण हवे असेल, त्यांना भारतीय जनता पक्षाचीच निवड करावी लागेल. जे दगडफेक करणाऱ्यांचे समर्थक आहेत, जे द्वेषाच्या गप्पा मारतात, जातिवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण वाढवण्याची मानसिकता ठेवतात, असे लोक इंडिया आघाडीसोबत आहेत पण त्यांची संख्या फक्त ५ टक्के आहे, अशी टीकाही परमहंस आचार्य यांनी केली.
परमहंस आचार्य म्हणाले की, यावेळी राष्ट्रवादाच्या नावावर निवडणुका होणार आहेत. मोदींचा चेहरा पाहूनच मतदान केले जाईल. भाजपकडून कोणीही उभे असले तरी येथे कमळाचे बटण दाबले जाईल. यावेळी ५०० हून अधिक जागा उपलब्ध असतील. आम्ही संत आहोत. संतांसाठी सर्व काही समान आहे, पण राष्ट्र प्रथम आहे, राष्ट्र सर्वोच्च आहे आणि इतर सर्व पक्षांसाठी कुटुंब प्रथम आहे, असेही ते म्हणाले.