मुलगा 18 वर्षांचा झाला की त्याला सांभाळणं पालकांना बंधनकारक नाही - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2016 12:26 PM2016-03-19T12:26:28+5:302016-03-19T12:28:21+5:30

मुलाच्या पालनपोषणाची पालकांची जबाबदारी ही तो 18 वर्षांचा होईपर्यंतच आहे आणि तो कमावता होईपर्यंत पालकांनी त्याला पोसलं पाहिजे असं कायदा मानत नसल्याचे

Parents are not obliged to take care of their son when he is 18 years old - High Court | मुलगा 18 वर्षांचा झाला की त्याला सांभाळणं पालकांना बंधनकारक नाही - हायकोर्ट

मुलगा 18 वर्षांचा झाला की त्याला सांभाळणं पालकांना बंधनकारक नाही - हायकोर्ट

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 19 - मुलाच्या पालनपोषणाची पालकांची जबाबदारी ही तो 18 वर्षांचा होईपर्यंतच आहे आणि तो कमावता होईपर्यंत पालकांनी त्याला पोसलं पाहिजे असं कायदा मानत नसल्याचे अहमदाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अर्थात, मुलगा शारिरीक अथवा मानसिकदृष्ट्या अधू असल्यास बाब वेगळी असेही उच्च न्यायालयामे म्हटले आहे.
मात्र, मुलीच्या बाबतीत ती सज्ञान झाल्यानंतरही तिच्या पालनपोषणाची जबाबदारी पालकांची असून तिच्या लग्नाचा खर्चही त्यांनी करणं अपेक्षित असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मात्र, ही तरतूद मुलाच्या बाबतीत नाहीये. CrPC च्या 125 कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की मुलगा शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर 18 वर्षांचा झाला की त्याच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देणं आई अथवा वडिलांची जबाबदारी नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले.
एका खटल्यामध्ये घराबाहेर काढलेल्या महिलेने आपल्यासाठी व मुलासाठी नवऱ्याकडून पोटगी मागितली होती, त्यावर निवाडा देताना मुलाचा 18 वर्षांपर्यंत खर्च करणं आवश्यक आहे, परंतु त्यानंतर तो कायद्यानं बंधनकारक नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

Web Title: Parents are not obliged to take care of their son when he is 18 years old - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.