आई वडिलांनी नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी दरवाजा ठोठावला अन्...; वसतिगृहात मुलाचा मृतदेह पाहून पालकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:35 IST2025-01-13T15:33:36+5:302025-01-13T15:35:21+5:30

आयआयटी खरगपूर येथील हॉस्टेलमध्ये २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Parents came to meet their son 21 year old student end his life in his hostel room at IIT Kharagpur | आई वडिलांनी नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी दरवाजा ठोठावला अन्...; वसतिगृहात मुलाचा मृतदेह पाहून पालकांचा आक्रोश

आई वडिलांनी नेहमीप्रमाणे भेटण्यासाठी दरवाजा ठोठावला अन्...; वसतिगृहात मुलाचा मृतदेह पाहून पालकांचा आक्रोश

IIT Kharagpur: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर येथील हॉस्टेलमध्ये एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसले तरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संस्थेच्या एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून आलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी विद्यार्थ्याच्या खोलीचा दरवाजा उघडला असता, त्यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह खोलीत लटकलेला दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मेदिनीपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

शॉन मलिक असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. रविवारी त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी आले असता त्यांना त्यांचा मुलगा खोलीत लटकलेल्या अवस्थेत दिसला. दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीय व संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी मिळून दरवाजा तोडला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आयआयटीच्या आझाद हॉलमधील खोली क्रमांक ३०२ मध्ये शॉन राहत होता. मुलाला अशा अवस्थेत पाहून त्यांच्या पालकांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरचे संचालक अमित पात्रा यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना खूपच धक्कादायक होती. मुलाचे आई-वडील त्याला भेटायला आणि जेवण द्यायला आले होते. ते दर रविवारी येत असत. मुलगा अभ्यासात खूप चांगला होता. त्याचे शिक्षकांशी चांगले संबंध होते. त्याच्या वागण्यात काहीही नकारात्मक आढळले नाही, असं संचालक अमित पात्रा म्हणाले.  

काही दिवसांपूर्वीच खरगपूर आयआयटीच्या लॅब असिस्टंटचा मृतदेह अशाच प्रकारे क्वार्टरमधून सापडला होता. गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्या आहेत. पण त्याचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचेही पात्रा म्हणाले. दुसरीकडे, घटनेनंतर, मलिकचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन पूर्ण झाले असून आणि प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, आयटी-खरगपूरमध्ये गेल्या काही काळात विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. जून २०२४ मध्ये, आयआयटी-खरगपूरची विद्यार्थिनी, देविका पिल्लई हिने कॉलेज कॅम्पसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी के किरण चंद्रा हिचाही मृतदेह आढळला होता. याआधी, २०२२ मध्ये, आयआयटीचा विद्यार्थी फैजान अहमद कॅम्पसमध्ये मृत आढळला होता.

Web Title: Parents came to meet their son 21 year old student end his life in his hostel room at IIT Kharagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.