SSC Exam : बस अपघातात हरपलं आई-वडिलांचं छत्र; तरीही हिंमतीने जिया-सौम्य यांनी केली परीक्षेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 02:44 PM2020-03-03T14:44:13+5:302020-03-03T14:46:36+5:30
SSC Exam : अपघातात सौम्य याचे आई-वडील आणि छोट्या भावाचा मृत्यू झाला तर जियाचे आई-वडील आणि छोट्या बहिणीचा मृत्यू झाला.
कोटा - राजस्थानच्या मेज नदीत लग्नाच्या वऱ्हाडाची बस कोसळल्याने एकाच घरातील २४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. याच घटनेतील आणखी एक भीषणता समोर येत आहे. अपघातामुळे ११ वर्षीय सौम्य आणि जिया यांच्या डोक्यावरचं आई-वडिलांचे छत्र हरपलं.
अपघातात सौम्य याचे आई-वडील आणि छोट्या भावाचा मृत्यू झाला तर जियाचे आई-वडील आणि छोट्या बहिणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दोन्ही मुलांचे आयुष्य पूर्णत: बदलले, दोन्ही मुलांना धीर देण्यासाठी कुटुंबातील नातेवाईक पुढाकार घेत आहेत. पण त्यांचे दुख: कधीही न भरुन येणारे आहे. दोन्ही मुलांच्या परीक्षा तोंडावर असताना परीक्षा देणार कसं? हा प्रश्न उपस्थित होतो.
नातेवाईक, शिक्षक आणि वर्गातील मित्रपरिवार यांनी हिंमत दिल्याने अपघाताचं दुख: बाजूला सारुन मुलांनी परीक्षेची तयारी सुरु केली. परीक्षेत चांगले मार्क आणून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणं हे ध्येय बनलं आहे. सौम्य सेंट पॉल्स माला रोड येथे चौथीच्या वर्गात शिकतो. सध्या त्याची परीक्षा सुरु आहे. ६ दिवसांपूर्वी आई मिथलेश आणि वडील दिनेश यांच्यासोबत बसून तो अभ्यास करत होता पण आई-वडील नाहीत. या काळात त्याला मित्राच्या आईने साथ देत अभ्यासासाठी घेऊन गेली. सौम्यला डॉक्टर बनवण्याची दिनेश यांची इच्छा होती. पण घरातल्या या परिस्थितीने सगळं उद्ध्वस्त केले असं दिनेश यांच्या भावाने सांगितले.
तर जियाला यावर्षी क्लासमध्ये टॉप करायचे होते. पण हा अपघात झाला, अपघाताने कमी वयात जियाच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. घरच्या लोकांनी धीर देत जियाला परीक्षेसाठी तयार केले. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या जियाला मोठं होऊन पोलीस अधिकारी बनायचं आहे. अपघातात जियाची छोटी बहीणही ठार झाली. कनिकाची बॅग्स आणि पुस्तक दाखवताना जियाच्या डोळ्यात पाणी येत होते. जिया आणि कनिका एकत्र शाळेत जात असे. आई-वडिलांच्या आठवणीत जिया रात्रीची उठून रडत असते. सध्या जियाला तिचे काका सुरेश आणि आजोबा बाबूलाल सांभाळतात.