Coronavirus: शौर्यपदक विजेत्या मुलाच्या अंत्यविधीला निवृत्त फौजी असलेल्या वडिलांची २ हजार कि.मी. परवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:32 AM2020-04-12T05:32:15+5:302020-04-12T05:32:35+5:30
संडे अँकर। विशेष विमानाअभावी करावा लागला रस्त्याने खडतर प्रवास
नवी दिल्ली : भारतीय लष्करातील शौर्यपदक विजेते कर्नल नवज्योतसिंग बाल यांचे दुर्मिळ कर्करोगाने बंगळुरू येथील लष्करी इस्पितळात शुक्रवारी दुर्दैवी निधन झाले. याहून दुर्दैव असे की, लष्करातूनच निवृत्त झालेल्या त्यांच्या ८३ वर्षांच्या वडिलांसह अन्य कुटुंबियांना अंत्यविधीला येण्यासाठी लष्कराचे विशेष विमान उपलब्ध करून द्यायचे की नाही याचा निर्णय ‘लालफिती’त अडकल्याने या दु:खी कुटुंबास गुरुग्राम ते बंगळुरू हा सुमारे दोन हजार कि.मी.चा प्रवास ‘लॉकडाऊन’मध्ये करण्याचे दिव्य त्यांच्या नशिबी ाले.
कर्नल नवज्योतसिंग यांचे ८३ वर्षांचे वडील, आई व भाऊ असे कुटुंबीय शुक्रवारी दुपारी गुरुग्रामहून रवाना झाले व ते रविवारी सकाळपर्यंत बंगळुरू येथे पोहोचणे अपेक्षित आहे.सैन्य दलातील अधिकाऱ्याचे पार्थिव त्याच्या घरी नेण्यासाठी सैन्य दलाचे विमान वापरता येते. परंतु सैन्य दलात नसलेल्या त्याच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी सैन्य दलाच्या विमानाने आणायचे असेल तर त्यासाठी विशेष परवानगी लागते.
निडर लष्करी कमांडो गमावला
च्कर्नल नवज्योतसिंग बाल यांच्या अकाली निधनाने ‘भीती हा शब्दही माहीत नसलेला एक निडर अधिकारी गमावल्याची’ खंत लष्करी वर्तुळात व्यक्त होत आहे. लष्कराच्या ‘२ पॅरा एसएफ युनिट’ या विशेष कमांडो तुकडीचे ते कमांडर होते.
च्युनिटचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर लगचेच त्यांनी काश्मीरच्या लोलाब खोºयात हातघाईच्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला होता. त्याबद्दल ‘शौर्यपदक’ हे दुसºया क्रमांकाचे पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले होते; पण दुर्दैवाने त्यांना कर्करोग झाला. त्यातच त्यांचा उजवा हात गेल्या वर्षी कापून टाकावा लागला.
च्तरीही लष्करी अधिकाºयास साजेशा सळसळत्या चैतन्याने ते दैनंदिन कामे करीत होते. परंतु अखेर कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. त्यांच्या पश्चात पत्नी व अनुक्रमे आठ व चार वर्षांचे दोन मुले आहेत.
दिरंगाई...
दिवंगत कर्नल नवज्योतसिंग यांचे वडीलही लष्कराचे निवृत्त अधिकारी आहेत व त्यांचे वय ८० च्या पुढे आहे हे लक्षात घेऊन लष्कराने त्यांच्यासाठी हवाई दलाचे विमान वापरायची परवानगी घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे अर्ज केला. ‘लालफिती’च्या दिरंगाईमुळे या कुटुंबाला रस्त्याने प्रवास करावा लागला.