"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:09 PM2024-11-12T16:09:41+5:302024-11-12T16:20:05+5:30

आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

parents not giving good values to hindu youth said maulana tauqeer raza controversial statement | "हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान

आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. माझे जयपूरमधील विधान सरकारसाठी होते की, सरकारचा आत्मा हादरेल. पण ते हिंदू समाजासाठी आहे, असे मांडण्यात आले. पण तसे नाही, असे दिल्लीतील पत्रकार परिषदेत मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले. तसेच, आमचे तरुण आमच्या नियंत्रणात आहेत आणि आम्ही त्यांना नियंत्रणात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. पण, याचा अर्थ आमचे तरुण भित्रे आहेत असे नाहीत, आम्हाला फक्त देशात शांतता हवी आहे, असे मौलाना तौकीर रझा म्हणाले. 

मौलाना तौकीर रझा म्हणाले की, मी हिंदू समाजाचा अधिक विचार करतो. हजारो मुस्लिम मुलींना हिंदू मुलांनी फूस लावून नेले. हजारो हिंदू मुलींचा त्या हिंदू मुलांवर काही अधिकार होता की नाही? मौलाना तौकीर रझा पुढे म्हणाले की, आमच्या हिंदू तरुणांना त्यांच्या पालकांकडून चांगले संस्कार केले जात नाहीत. पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तसेच, आपले म्हणणे देशाच्या हिताचे असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत तौकीर रझा यांनी सांगितले.

पीएम मोदींवरही केली टिप्पणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा मौलाना तौकीर रझा यांनी टिप्पणी केली आहे. मौलाना तौकीर रझा म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकजूट राहिलात तर सुरक्षित राहाल. पंतप्रधानांनी पंतप्रधान म्हणून त्यांच्या क्षमतेनुसार बोलले पाहिजे. ते १४० कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. त्यांनी हे केवळ हिंदूंसाठीच नाही तर संपूर्ण भारतातील लोकांसाठी सांगितले असते.

पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही- मौलाना तौकीर रझा
मौलाना तौकीर रझा म्हणाले की, जर आपल्या देशात अवैधपणे घुसखोर येत असतील तर ते आपल्या सरकारचे अपयश आहे. येथील मुस्लिमांवर नव्हे तर सुरक्षा दलांवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. अखंड भारत बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत पसरलेला आहे. भारताकडे एवढी ताकद असेल तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा भारतात समावेश करा. तसेच, पाकिस्तानची निर्मिती मुस्लिमांनी केलेली नाही. उलट ज्यांनी मुस्लिमांचा द्वेष केला, त्यांनीच पाकिस्तान निर्माण केला. ज्याला आरएसएस आणि हिंदू महासभेने पाठिंबा दिला होता, असेही मौलाना तौकीर रझा यांनी सांगितले.

Web Title: parents not giving good values to hindu youth said maulana tauqeer raza controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.