सम-विषम नियमाचं उल्लंघन केल्यामुळे परेश रावल यांना दंड
By admin | Published: April 25, 2016 02:33 PM2016-04-25T14:33:21+5:302016-04-25T14:33:21+5:30
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांना सम-विषम नियमाचं उल्लंघन केल्यामुळे दंड भरावा लागला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 25 – भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांना सम-विषम नियमाचं उल्लंघन केल्यामुळे दंड भरावा लागला आहे. परेश रावल यांनी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माफी मागत ही गंभीर घोडचूक असल्याचंही म्हटलं आहे. गंभीर घोडचूक केली आहे, अरविंदजी आणि दिल्लीकरांची माफी मागतो असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे.
सोमवारी परेश रावल वैयक्तिक कारने संसदेत पोहोचले होते. पण सोमवारी रस्त्यावर फक्त विषम क्रमांकाच्या गाड्यांना परवानगी असताना परेश रावल यांनी सम क्रमांकाच्या गाडीचा वापर केला होता. त्यामुळे परेश रावल यांना दंड आकारण्यात आला.
सोमवारपासून अधिवेशन सुरु होत असल्याने संसदेत पोहोचण्यासाठी खासदारांना खास डीटीसी बस सेवेची सुविधा देण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे.
Made a serious blunder by travelling in a odd number car to parliament ... Sorry to Arvind ji n Delhiite...
— Paresh Rawal (@SirPareshRawal) April 25, 2016
Paid ... pic.twitter.com/6BhqsV9FxT
— Paresh Rawal (@SirPareshRawal) April 25, 2016