अब्दुल कलामांच्या "त्या" फोटोमुळे परेश रावल वादात

By admin | Published: July 3, 2017 07:48 PM2017-07-03T19:48:24+5:302017-07-03T19:48:24+5:30

बॉलीवूड अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल हे सध्या ट्विटराइट्सच्या निशाण्यावर आहेत. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा ट्विटरद्वारे

Paresh Rawal Vaadaat by Abdul Kalam's "That" photo | अब्दुल कलामांच्या "त्या" फोटोमुळे परेश रावल वादात

अब्दुल कलामांच्या "त्या" फोटोमुळे परेश रावल वादात

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बॉलीवूड अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल हे सध्या ट्विटराइट्सच्या निशाण्यावर आहेत. माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा ट्विटरद्वारे एक फोटो शेअर करून ते वादात सापडले आहेत.  
 
अब्दुल कलामांबाबत शेअर केलेल्या फोटोवरील ओळी चुकीच्या असून कलाम कधी असे म्हणालेच नव्हते असं म्हणत ट्विटराइट्सने रावल यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. खोटं ट्वीट करण्यामागे कारण काय होतं अशी त्यांना विचारणा केली जात आहे.  तर व्हॉट्सअॅपवर हा फोटो अनेक दिवसांपासून व्हायरल होत होता, व्हॉट्सअॅपच्या खोट्या विद्यालयामुळे परेश रावल यांची फसवणूक झाल्याचं म्हणत ट्रोल करणा-यांनी रावल यांची खिल्ली उडवली आहे.  
 
अब्दुल कलामांच्या फोटोवर लिहिलेल्या ओळी-  
मुझे पाकिस्तान ने अपनी तरफ मिलाने की हर संभव कोशिश की। मुझे देश का हवाला दिया गया। मुझे इस्लाम का हवाला दिया गया। मुझे कुरान का हवाला दिया गया लेकिन मैंने अपनी मातृभूमि से कोई गद्दारी नहीं की। क्योंकि अपने कर्तव्य से हटना मेरे धर्म और देश दोनों के लिए एक बदनामी की बात होती। 
 
या ओळी डॉक्टर कलाम यांच्या असल्याचं सांगत परेश रावल यांनी हे ट्वीट केलं आहे.