परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:03 PM2022-01-27T12:03:07+5:302022-01-27T12:09:27+5:30
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. रावल यांचं ...
मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. रावल यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेच ठरत आहे. त्यामध्ये, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकविण्यापेक्षा, आपण गुलाम का बनलो होतो, हे शिकवणे जास्त गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
आजादी कैसे मीली पढाने से बेहतर ,,
— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 27, 2022
गुलाम क्यु हुए थे पढाना ज्यादा जरुरी.
देशात बुधवारी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभक्तीचं वातावरण या निमित्त पाहायला मिळालं. त्यातूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्य लढ्याच्या चर्चाही झडल्या. दरम्यान, परेश रावल यांनी केलेल्या ट्विटमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, या ट्विटचे वेगवेगळे अर्थही काढण्यात येत आहेत. अनेकांना या ट्विटवरुन त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या ट्विटरवरील कमेंटमध्ये नेटीझन्सने हेरी फेरी चित्रपटातील मिम्सचे छायाचित्र शेअर केले आहेत. तर, काहींनी त्यांच्या व्याक्यातील व्याकरणाच्या चुका शोधून काढल्या आहेत