G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 01:51 PM2023-10-01T13:51:39+5:302023-10-01T13:52:18+5:30

देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे. 

Parliament 20 summit in india g20 summit in india, new parliament building p20 | G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार!

G20 नंतर भारत आता P20 चे आयोजन करण्याच्या तयारीत, देशाची नवी संसद जगाला दिसणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : G20 शिखर परिषदेच्या मोठ्या यशानंतर आता P20 म्हणजेच पार्लमेंट-20 साठी दिल्लीत तयारी सुरू आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत G20 शिखर परिषदेत सहभागी सर्व देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत येणारे खासदारांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे. 

एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या ध्येयांसह भारत P20 परिषदेत आपला शतकानुशतके जुना लोकशाही इतिहास जगासमोर मांडणार आहे. P20 शिखर परिषदेचा मुख्य कार्यक्रम 13-14 ऑक्टोबर आहे, परंतु 12 ऑक्टोबरपासून परिषद सुरू होईल. पहिल्या दिवशी पार्लमेंटरी फोरम ऑन लाईफ या थीमवर अनेक कार्यक्रम होणार आहेत. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांना अंतिम रूप दिले जात आहे. परिषदेत एकूण चार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

"Agenda 2030 for SDGs: Showcasing Achievements, Accelerating Progress" असे पहिल्या सत्राचे नाव आहे. हे 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकास लक्ष्यांवर आधारित आहे. यामध्ये कोरोना महामारीनंतर जागतिक स्तरावर गरिबी आणि मागासलेपणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बनवलेल्या धोरणांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. या सत्रात भारत आपल्या विविध लोककल्याणकारी योजना सर्व देशांसमोर रोल मॉडेल म्हणून मांडणार आहे. 

दुसरे सत्र "Sustainable Energy Transition: Gateways to a Green Future" या विषयावर आहे. हे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांद्वारे हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याबद्दल आहे. तसेच,  या सत्रादरम्यान विकसित देशांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल ज्याअंतर्गत अर्थसंकल्प आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसनशील देशांना मदत करण्याचे मान्य करण्यात आले.

याचबरोबर,"Mainstreaming Gender Equality: From Womens Empowerment to Women-Led Development" असे तिसऱ्या सत्राचे नाव आहे. या सत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नव्या संसदेच्या सुरुवातीलाच महिला आरक्षण विधेयक मंजूर करून भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे. यानंतर चौथे आणि अंतिम सत्र "Transformation in Peoples Lives through Public Digital Platforms" या विषयावर आहे.

Web Title: Parliament 20 summit in india g20 summit in india, new parliament building p20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.