संसदेत महागाईवर स्थगन प्रस्ताव
By admin | Published: July 8, 2014 12:48 AM2014-07-08T00:48:26+5:302014-07-08T00:48:26+5:30
संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसचा स्थगन प्रस्तावाचा हल्ला परतवून लावण्यात सत्ताधारी भाजपाचा सोमवारी वेगवेगळा दृष्टिकोन बघावयास मिळाला.
Next
हरिश गुप्ता - नवी दिल्ली
संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसचा स्थगन प्रस्तावाचा हल्ला परतवून लावण्यात सत्ताधारी भाजपाचा सोमवारी वेगवेगळा दृष्टिकोन बघावयास मिळाला.
संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी कपात सूचना मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी प्रश्नोत्तराचा तास आणि अन्य नियोजित कामकाज स्थगित करून या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी सहज मान्य केली. सरकारला लोकसभेत प्रचंड मताधिक्य असल्याने स्थगन प्रस्ताव फेटाळला जाण्याची जवळजवळ खात्री असली तरी नायडू यांनी काँग्रेस प्रायोजित प्रस्तावाला दाद दिली नाही. त्याची परिणती गोंधळ आणि रालोआ सरकारच्या अव्यवस्थापनामुळे प्रारंभी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात झाले. परंतु राज्यसभेत अनपेक्षितपणो अरुण जेटली यांनी कपात सूचना मान्य केल्याने विरोधी पक्षाला नमते घ्यावे लागले.
भाजपा स्थगन प्रस्ताव मान्य करणार नाही आणि लोकसभेप्रमाणो राज्यसभादेखील दिवसभरासाठी तहकूब होईल, असे काँग्रेसला वाटत होते. परंतु जेटली चर्चेसाठी लगेच तयार झाल्याने काँग्रेसची कोंडी झाली. काँग्रेसचा कोणताही नेता चर्चेसाठी तयार नव्हता. प्रफुल्ल पटेल (एनसीपी) आणि सीताराम येचुरी (सीपीएम) वगळता कोणाच्याही हल्ल्यात धार नव्हती.