हार्ले-डेविडसन बाईकवरुन महिला खासदाराची संसदेत एंट्री
By admin | Published: March 8, 2016 04:33 PM2016-03-08T16:33:56+5:302016-03-08T16:33:56+5:30
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला खासदार रणजीत रंजन यांनी मंगळवारी थेट हार्ले-डेविडसन बाईकवरुन संसदेमध्ये एंट्री करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला खासदार रणजीत रंजन यांनी मंगळवारी थेट हार्ले-डेविडसन बाईकवरुन संसदेमध्ये एंट्री करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेस पक्षाच्या रणजीत रंजन लोकसभेमध्ये बिहारच्या सूपॉल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ४२ वर्षीय रणजीत खास महिला दिनाच्या निमित्ताने आज संसदेमध्ये आपली हार्ले-डेविडसन बाईक घेऊन आल्या होत्या.
निळया रंगाचा सूट, हेल्मेट आणि डोळयांना गॉगल लावलेल्या रणजीत रंजन यांनी हार्ले डेविडसनवरुन संसदेत एकदम झोकात प्रवेश केला. दोन मुलांची आई असणा-या रणजीत यांचे त्यांच्या हार्ले डेविडसन बाईकवर इतके प्रेम आहे की, त्या पती राजेश रंजन यांना बाईकला स्पर्शही करु देत नाहीत. राजेश रंजनही लोकसभेमध्ये खासदार आहेत. रणजीत यांनी स्वत:च्या कमाईमधून ती बाईक विकत घेतली आहे.
हार्ले डेविडसन ही महागडी बाईक आहे. साडेचार लाखापासून या बाईकची किंमत सुरु होते. दुचाकी आणि सायकलवरुन आपण नियमित संसदेत येतो असे त्यांनी सांगितले. माझे आयुष्य असे आहे की, आतापर्यंत मी जे काही केले त्यावर माझ्या पालकांनी कधीही आक्षेप घेतला नाही असे रणजीत यांनी सांगितले. लोकसभेमध्ये महिला दिनाच्या चर्चेमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.
Congress MP Ranjeet Ranjan rides a bike to the Parliament #InternationalWomensDaypic.twitter.com/oslAzSCl8u
— ANI (@ANI_news) March 8, 2016