एका 'वानरा'ने हलवली संसद

By Admin | Published: July 29, 2016 09:56 PM2016-07-29T21:56:41+5:302016-07-29T21:57:08+5:30

शुक्रवारी खासदारांनी नव्हे तर एक वानरानं संसद गाजवली.

Parliament 'moved with a' Vanara ' | एका 'वानरा'ने हलवली संसद

एका 'वानरा'ने हलवली संसद

googlenewsNext

शीलेश शर्मा
नवी दिल्ली, दि. 29 - संसदेमध्ये राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांचा भरपूर गोंधळ बघावा आणि ऐकावा लागतो. परंतु शुक्रवारी एका वानराने संसदेच्या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेच्या नाकीनऊ आणले होते. शुक्रवारी खासदारांनी नव्हे तर एक वानरानं संसद गाजवली. हे वानर स्वत: आले अन् धुमाकूळ घातला आणि तसेच स्वत:च निघूनही गेले.

संसदेच्या केंद्रीय कक्षाच्या शेजारी असलेल्या पुस्तकालयात हे वानर घुसले. आपण आल्याचे कोणाला कळू नये म्हणून त्याने दबक्या पावलांनी प्रवेश केला. एकदाचा प्रवेश करताच ते मग वाघ बनले. ते इकडून तिकडे फिरले. परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नंतर त्याने उपद्रव सुरू केला. या टेबलवरून त्या टेबलवर ते उड्या मारू लागले. हा त्याचा खेळ जवळपास तासभर चालला. तेथे कर्तव्यावर असलेले सुरक्षा कर्मचारी हतबल झाले होते.

कारण या वानराला पकडायचे कोणी? सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावण्यात तर आले पण त्यांचा उपयोग झाला नाही. तेथून बाहेर पडता येत नसल्यामुळे वानरही त्रस्त आणि गोंधळलेले होते. कॉरिडॉरमध्ये लावलेल्या तारांवरही त्याने निष्फळ प्रयोग करून बघितला. मग त्याची दृष्टी मुख्य प्रवेशद्वाराकडे गेली आणि त्याला लक्षात आले की येथून बाहेर पडता येऊ शकते. दबक्या पावलांनी मग हे वानर त्या दिशेने बाहेरही पडले.

आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांनी केलेल्या व्हिडीओवरून भरपूर वादंग झाले. पण या वानराने संसदेत प्रवेश करूनही कुठेच काही चर्चा नाही. वानरांच्या बंदोबस्तासाठी संसदीय सचिवालय दरवर्षी मोठा खर्च करून कंत्राट देते. तरीही संसदेच्या साऊथ आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये वानरांचा खेळ अव्याहतपणे सुरूच आहे.

Web Title: Parliament 'moved with a' Vanara '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.