संसद घुसखोरी: आरोपीला ५ जानेवारीपर्यंत कोठडी; संपूर्ण कटाच्या तपासाची केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 05:20 AM2023-12-24T05:20:41+5:302023-12-24T05:20:51+5:30

संपूर्ण कटाचा शोध घेण्यासाठी त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. 

parliament security breach accused remanded till january 5 | संसद घुसखोरी: आरोपीला ५ जानेवारीपर्यंत कोठडी; संपूर्ण कटाच्या तपासाची केली मागणी 

संसद घुसखोरी: आरोपीला ५ जानेवारीपर्यंत कोठडी; संपूर्ण कटाच्या तपासाची केली मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): दिल्लीतील एका न्यायालयाने संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपी महेश कुमावतच्या कोठडीत ५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. दिल्ली पोलिसांच्या अर्जावर विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांनी आरोपी कुमावतच्या कोठडीची मुदत वाढवली. संपूर्ण कटाचा शोध घेण्यासाठी त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. 

सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले होते की, आरोपींना देशात अराजकता निर्माण करायची होती जेणेकरून ते सरकारला त्यांच्या बेकायदेशीर आणि अवाजवी मागण्या मान्य करण्यास भाग पाडू शकतील. हल्ल्यामागील खरे कारण आणि त्याचा शत्रू देश आणि दहशतवादी संघटनांशी असलेला संबंध शोधण्यासाठी कोठडी आवश्यक आहे, असे यात म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावत गुरुवारी रात्री सहआरोपी ललित झासोबत पोलिस ठाण्यात आला होता. दोघांनाही विशेष कक्षाच्या ताब्यात देण्यात आले. तेव्हापासून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी सांगितले की, तो ‘भगतसिंग फॅन क्लब’ पेजचा सदस्य होता. त्याला आता काढून टाकण्यात आले आहे. पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली कुमावत यांना अटक करण्यात आली आहे. मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे आणि नीलम देवी या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत दिल्ली न्यायालयाने गुरुवार ५ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.

 

Web Title: parliament security breach accused remanded till january 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.