Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल, चौकशी समितीही स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 08:46 AM2023-12-14T08:46:30+5:302023-12-14T09:10:06+5:30
देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला.
नवी दिल्ली : १३ डिसेंबर २००१ रोजी अतिरेक्यांनी देशाच्या जुन्या संसदेवर हल्ला केला होता. या घटनेच्या २२ वर्षानंतर म्हणजेच १३ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा नव्या संसदेत हल्ला झाला. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला.
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे. तसेच, या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही माहिती दिली आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे. तर संसदेतील घुसखोरीवर गृहमंत्री आज संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे. पोलिस तपासाबाबत गृहमंत्री अमित शाह दोन्ही सभागृहात माहिती देणार आहे.
Parliament security breach | A case under Sections 120-B (criminal conspiracy), 452 (trespassing), Section 153 (want only giving provocation with an intent to cause riot), 186 (obstructing public servant in discharge of public functions), 353 (assault or criminal force to deter…
— ANI (@ANI) December 14, 2023
केंद्रीय गृह विभागाने अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ज्ञ सदस्य आहेत. चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेच्या भंगाच्या कारणांची चौकशी करेल. तसेच, त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करणार आहे.
दरम्यान, संसदेच्या कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांचे नाव सागर शर्मा आणि मनोरंजन डी असे आहे. तसेच, त्यांच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. नीलम आणि अनमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. एकूण चार जण होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसद भवनाबाहेर धुराचे सोडल्यानंतर त्या दोघांनीही 'हुकूमशाही चालणार नाही', 'भारत माता की जय' आणि 'जय भीम, जय भारत' अशा घोषणा दिल्या.
तरुणांकडे कोणाचा पास?
सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम या चौघांचे पास म्हैसूरचे भाजप खा. प्रताप सिम्हा यांच्या नावावरून काढण्यात आले होते. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटून स्पष्टीकरण देत ते म्हणाले, मतदारसंघातील लोकांच्या सांगण्यावरून पास तयार केले होते. त्यांना मी ओळखत नाही.
खासदारांच्या पीएचे पास रद्द
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक बैठका घेतल्या व संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी प्रेक्षक गॅलरीचे सर्व पास रद्द केले. सर्व विद्यमान व माजी खासदारांच्या पीएचे पासही रद्द केले.
आयबीने दिला होता अलर्ट
इंटेलिजन्स ब्युरोने केंद्रीय तपास यंत्रणा व सरकारला अलर्ट दिला होता. कॅनडातील अतिरेकी पन्नू हा भारतातील संसदेवर हल्ला करू शकतो, असे म्हटले होते