संसदेचे अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:57 AM2020-08-21T04:57:50+5:302020-08-21T07:11:27+5:30
त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ९-१० सप्टेंबरला सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय सचिवालयाने अशा आशयाची माहिती सरकारला दिली आहे. त्या आधारावर केंद्रीय मंत्रिमंडळ २६ आॅगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊन अधिसूचना जारी करण्याबाबत सांगू शकते.
कठोर नियमावलीत सुरू होणाºया या अधिवेशनाचा कालावधीही कमी केला जात आहे. संसदेतील बैठक व्यवस्थेबाबत दोन्ही सभागृहांचे सचिवालय आताही विचारमंथन करीत आहेत. हे संसदेच्या केंद्रीय कक्षात माजी खासदार, पत्रकारांना प्रवेश नसेल.
पत्रकार दीर्घेमध्ये ५५ ते ६० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वयाच्या पत्रकारांना संसद परिसरात प्रवेश मिळणार नाही. संसद अधिवेशन सुरू होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसने विरोधी पक्षांसमवेत मिळून रणनीती आखून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलामनबी आझाद यांनी माकपा, सपासह इतर काही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे व याबाबतची चर्चा सुरू आहे.