संसद पाकिस्तानी जनतेच्या भक्कमपणे पाठीशी पेशावर हल्ल्याचा तीव्र निषेध : दोन्ही सभागृहात ठराव पारित

By admin | Published: December 18, 2014 12:40 AM2014-12-18T00:40:38+5:302014-12-18T00:40:38+5:30

नवी दिल्ली : पेशावरमधील शाळेवर तालिबानींनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत संसदेने बुधवारी पाकिस्तानी जनतेला भक्कम पाठिंबा जाहीर केला. मानवतेवर विश्वास असलेल्यांनी दहशतवादाचा पराभव करण्यासाठी एकजूट होण्याचे हे आवाहन आहे, असेही सरकारने स्पष्ट केले.

Parliament strongly opposes Peshawar attack: Both resolutions passed in the House | संसद पाकिस्तानी जनतेच्या भक्कमपणे पाठीशी पेशावर हल्ल्याचा तीव्र निषेध : दोन्ही सभागृहात ठराव पारित

संसद पाकिस्तानी जनतेच्या भक्कमपणे पाठीशी पेशावर हल्ल्याचा तीव्र निषेध : दोन्ही सभागृहात ठराव पारित

Next
ी दिल्ली : पेशावरमधील शाळेवर तालिबानींनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत संसदेने बुधवारी पाकिस्तानी जनतेला भक्कम पाठिंबा जाहीर केला. मानवतेवर विश्वास असलेल्यांनी दहशतवादाचा पराभव करण्यासाठी एकजूट होण्याचे हे आवाहन आहे, असेही सरकारने स्पष्ट केले.
पेशावर येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ मुलांचा मृत्यू झाला. या चिमुकल्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेने दोन मिनिटे मौन पाळले. पाकिस्तानची जनता आणि ज्यांनी मुले गमावली अशा कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करणारा ठराव लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मांडला. पेशावर येथील घटनेबद्दल सभागृहाला धक्का बसला असून या भ्याड हल्ल्याबद्दल तीव्र संतापाची भावना आहे. या अविवेकी हल्ल्याची आम्ही तीव्र निंदा करतो, असे या ठरावात म्हटले आहे. राज्यसभेत सभापती हमीद अन्सारी यांनी मांडलेल्या ठरावात म्हटले की, या अविवेकी, निघृर्ण आणि भ्याड हल्ल्याची तीव्र निंदा केली जावी. निरपराध मुलांचा प्राण जाणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. या हल्ल्यातून केवळ आमचा दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार भक्कम झाला आहे. अशा प्रसंगांना आम्ही अधिक ठामपणे सामोरे जाऊ. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन्ही सभागृहात पेशावरमधील हल्ला आणि सिडनीतील ओलीस प्रकरणावर निवेदन दिले.
---------------------
कोट
गेल्या दोन दिवसांतील दहशतवादाच्या घटना दोन वेगवेगळ्या उपखंडातील असून या दोन्ही घटना हतबलता दर्शविणाऱ्या असून दहशतवादाची काळी बाजू समोर आणणाऱ्या आहेत. मानवतेवर विश्वास असलेल्यांनी दहशतवादाचा पराभव करण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन देणाऱ्या या घडामोडी आहेत. भारताचे सरकार पेशावरमधील घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.
- सुषमा स्वराज
दोन्ही सभागृहातील निवेदन.

Web Title: Parliament strongly opposes Peshawar attack: Both resolutions passed in the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.