तकाम पारियो अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री?
By admin | Published: December 31, 2016 02:31 AM2016-12-31T02:31:42+5:302016-12-31T02:31:42+5:30
पिपल्स पार्टी आॅफ अरुणाचलकडून (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खांडू, उप मुख्यमंत्री चावना में आणि पाच अन्य आमदारांना कथित पक्षविरोधी कारवायांवरून निलंबित करण्यात
इटानगर : पिपल्स पार्टी आॅफ अरुणाचलकडून (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खांडू, उप मुख्यमंत्री चावना में आणि पाच अन्य आमदारांना कथित पक्षविरोधी कारवायांवरून निलंबित करण्यात आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी विभागाचे मंत्री तकाम पारिओ यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने मात्र आमचा पाठिंबा खांडू यांनाच असून, अन्य कोणत्याही नेत्यास मुख्यमंत्री करण्यास आम्ही विरोध करू, असे म्हटले आहे.
पीपीएचे अध्यक्ष काहफा बेंगिया यांनी सांगितले की, माजी उप मुख्यमंत्री कामेंग डोलो, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री तंगा ब्यालिंग व पारिओ हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. पण, पारियो यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सहमती झाली. पीपीएच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर औपचारिक घोषणा करण्यात येईल. सर्व प्रकारची औपचारिकता आज पूर्ण करण्यात येईल. अरुणाचल प्रदेशच्या ६० सदस्यीय विधानसभेत पीपीएकडे ४३, भाजपचे १२ आणि काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. एक अपक्ष आणि भाजपशी संबंधित एक सदस्य आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत विचारले असता बेंगिया म्हणाले की, पक्ष आज रात्रीच राज्यपालांशी संपर्क करेल.