मालकाने घातले पाळीव पोपटाचे श्राद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 09:14 AM2018-03-12T09:14:02+5:302018-03-12T09:14:02+5:30
हा पोपट पंकज कुमार यांना खूप प्रिय असल्याने त्यांनी एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
पाटणा: आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ नातेवाईक अनेक गोष्टी करतात. संबंधित व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा-आकांक्षा अतृप्त राहू नयेत, परलोकातील त्याचा प्रवास सुकर व्हावा, या भावनेने त्याचे श्राद्ध आणि इतर सोपस्कारही केले जातात. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच घालण्यात आलेले श्राद्ध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे श्राद्ध कुणा मनुष्याचे नव्हे तर एका पोपटाचे होते.
येथील अमरोहच्या हसनपूर परिसरात रविवारी श्राद्धाचा हा कार्यक्रम पार पडला. हे श्राद्ध पंकज कुमार यांच्या पाळीव पोपटाचे होते. 5 मार्च रोजी पंकज कुमार यांच्याकडील पोपटाचा मृत्यू झाला होता. पाच वर्षांपूर्वी पंकज कुमार यांनी हा पोपट घरी आणला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला उडता येत नव्हते. तेव्हापासून हा पोपट पंकज कुमार यांच्याकडे होता. अखेरच्या दिवसांमध्ये आम्ही त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. माझ्या मुलापेक्षा जास्त आम्ही त्याची काळजी घेत होतो, असे पंकज कुमार यांनी सांगितले.
हा पोपट पंकज कुमार यांना खूप प्रिय असल्याने त्यांनी एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नव्हे काल हसनपूर येथे पोपटाचा श्राद्धविधी पार पडला. यावेळी पारंपारिक हिंदू पद्धतींनुसार हवन करण्यात आले. तसेच लोकांना भोजनही देण्यात आले.
Last rites of a pet parrot, who died on March 5, conducted with traditional Hindu rituals of 'havan' & 'bhoj' in Amroha's Hasanpur y'day; owner Pankaj Kumar says, 'adopted it 5 yrs ago when it couldn't fly because of leg injury, treated him even better than my son' #UttarPradeshpic.twitter.com/219c1PuAnB
— ANI UP (@ANINewsUP) March 12, 2018