मध्यमवर्गीयांना अंशत: दिलासा! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्केच प्राप्तिकर
By admin | Published: February 1, 2017 01:03 PM2017-02-01T13:03:10+5:302017-02-01T15:39:59+5:30
केंद्र सरकारकडून मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यात आला आहे. मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यात आली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामधून प्राप्तिकर भरणाऱ्यांना हातचे राखून दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही फेरबदल न करता जेटली यांनी अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या वर्गाकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच प्राप्तिकर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्राप्तिकराच्या चौकटीत मोठे फेरबदल होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.
जेटली यांनी प्राप्तिकराच्या चौकटीत फेरबदल जाहीर केले नाहीत. मात्र अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा-यांकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न गट व 10 लाख रुपयांवरील उत्पन्न असणा-या गटासाठीची कररचना जैसे थेच ठेवण्यात आली आहे. ही कररचना आधीप्रमाणेच अनुक्रमे 20 व 30 टक्केच आकारण्यात आली आहे. त्याबरोबरच 50 लाख ते एक कोटी रुपये उत्पन्न असलेल्यांच्या उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज लावण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही, असे अरुण जेटली यांनी सांगितले.