ग्रामपंचायत कार्यालयात रंगली पं.स.च्या अधिकार्‍यांची पार्टी

By admin | Published: March 6, 2016 11:37 PM2016-03-06T23:37:48+5:302016-03-06T23:37:48+5:30

आव्हाणे ता.जळगाव : पंचायत समितीच्या काही अधिकारी व सदस्यांनी तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीत रविवारी रात्री मटन व दारुची मनसोक्तपणे पार्टी झोडपल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून पार्टीत सहभागी असलेल्यांना रंगेहाथ पकडले. या गोंधळात काही अधिकार्‍यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.

Party party officials of Gram Panchayat office | ग्रामपंचायत कार्यालयात रंगली पं.स.च्या अधिकार्‍यांची पार्टी

ग्रामपंचायत कार्यालयात रंगली पं.स.च्या अधिकार्‍यांची पार्टी

Next
्हाणे ता.जळगाव : पंचायत समितीच्या काही अधिकारी व सदस्यांनी तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीत रविवारी रात्री मटन व दारुची मनसोक्तपणे पार्टी झोडपल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून पार्टीत सहभागी असलेल्यांना रंगेहाथ पकडले. या गोंधळात काही अधिकार्‍यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे.
या अधिकार्‍यांनी रात्री दहा वाजता घाईगडबडीत कार्यक्रम आटोपता घेत तेथून पळ काढला. पंचायत समितीच्या सभापती छाया सुनील मारे यांच्याकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने त्यांचे पती सुनील मोरे यांनी पंचायस समितीच्या काही सदस्य अधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर या सर्वांची जेवणाची व दारुची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली होती. संध्याकाळी आठ वाजेपासून सुरु झालेला हा कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत सुरु होता. ग्रामपंचायत कार्यालयात ओली पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर ग्रामस्थांनी तेथे धाव घेवून पार्टीबाबत जाब विचारला. यावेळी सदस्य व अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली. या गोंधळात काही अधिकार्‍यांना धक्काबुक्की झाली. ग्रामस्थांचा रोष पाहून पार्टी अर्धवट सोडून सर्वांनी तेथून पळ काढला. दरम्यान, या रंगीतसंगीत पार्टीचे अनेकांनी व्हीडीओ व छायाचित्रण केले आहे.

Web Title: Party party officials of Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.