भ्रष्टाचाराचे आरोप असूनही लालुंच्या मुलाला पक्षाचा भक्कम पाठिंबा

By Admin | Published: July 10, 2017 05:07 PM2017-07-10T17:07:32+5:302017-07-10T17:39:38+5:30

राष्ट्रीय जनता दलाने लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Party strong support for Lalu's son despite allegations of corruption | भ्रष्टाचाराचे आरोप असूनही लालुंच्या मुलाला पक्षाचा भक्कम पाठिंबा

भ्रष्टाचाराचे आरोप असूनही लालुंच्या मुलाला पक्षाचा भक्कम पाठिंबा

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - येत्या काही दिवसात बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. राष्ट्रीय जनता दलाने लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवच्या  पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. तेजस्वी एक चांगले नेते आहेत असे राजदकडून सांगण्यात आले. तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री असून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 
 
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री नितीश कुमार मौन बाळगून आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. मंगळवारी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत तेजस्वी यांच्याकडून राजीनामा घेण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे राजकीय विश्लेषकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. 
 
सीबीआयने मागच्याच आठवडयात हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता. 
 
आणखी वाचा 
 
पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अब्दुल बारी सिद्दीकी यांनी भाजपावर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न होत आहे पण असे घडणार नाही. आम्ही पुन्हा उसळी घेऊन उभे राहू असे त्यांनी सांगितले. 
 
लालू प्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे एकवेळचे परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक होते. पण 2014 लोकसभा निवडणुकीपासून भाजपाचा चौफेर उधळलेला विजयाचा वारु रोखण्यासाठी नितीश-लालू एकत्र आले. बिहारच्या जनतेनेही विधानसभा निवडणुकीत या आघाडीला साथ दिली आणि 2015 साली बिहारमध्ये राजद-जदयूचे सरकार स्थापन झाले. 
 
मागच्याच आठवडयात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात सीबीआयने शुक्रवारी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या बारा ठिकाणांवर छापे मारीची कारवाई केली. लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करुन भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान  देशाचे रेल्वेमंत्री होते.
 

Web Title: Party strong support for Lalu's son despite allegations of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.