परवेझ खान सिमीचा कार्यकर्ता
By Admin | Published: October 28, 2015 10:38 PM2015-10-28T22:38:26+5:302015-10-29T00:28:23+5:30
सिमी खटला : तपासाधिकारी अनिल ठाकरे यांची साक्ष
सिमी खटला : तपासाधिकारी अनिल ठाकरे यांची साक्ष
जळगाव: परवेझ खान हा सिमीचा कार्यकर्ता होता व मी त्याला ओळखतो अशी साक्ष तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अनिल ठाकरे यांनी न्यायालयात दिली. देशविघात कृत्य करणार्या सिमीच्या खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.के.पटनी यांच्या न्यायालयात यावर कामकाज झाले.
ठाकरे यांनी सांगितले की,२३ ऑगस्ट २००६ रोजी आरोपी परवेझ खान याला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सी.टी.धाकराव यांनी अटक केली होती. त्यानंतर या गुन्ाचा तपास मी स्थानिक गुन्हे शाखेत असताना माझ्याकडे सोपविण्यात आला होता. परवेझ खान गु.र.नं.क्रमांक १०३/२००१ मध्ये फरार होता. त्याला दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात २८ ऑगस्ट २००६ रोजी शेख सायबु शेख सुपडू याची साक्ष नोंदवून घेण्यात आली होती. त्याने पोलिसांकडे नोंदविलेल्या साक्षीत आरोपी हा सिमी संघटनेचा कार्यकर्ता होता.त्याने फारुख शेख याच्याकडे मशिदीत सिमीची बैठक घेण्याची परवानगी मागितली होती.शेख सुपडू याचा मुलगा आरोपीसोबत राहत होता.त्याला आरोपींनी काश्मीर येथे जिहादचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले होते. यापूर्वी २००१ मध्ये अकरा आरोपींविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात आसिफ याचा फरार म्हणून उल्लेख होता. दरम्यान, परवेझ याच्याविरुध्द पुरावे मिळाल्याने त्याच्याविरुध्द पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आसिफ खान याच्याविरुध्दही पुरावा मिळाल्याने वाय.डी.पाटील यांनी त्याच्याविरुध्द पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. पाटील आज हयात नाहीत तर परवेझला मी ओळखतो तो कोर्टात बसला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सरकारी वकील म्हणून ॲड.टी.डी.पाटील यांनी काम पाहिले. पुढील कामकाज १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.