विमानाखालून प्रवाशांची कार जाणार, वेळ वाचणार; देशातील पहिला ‘टॅक्सी वे’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:14 AM2023-07-20T06:14:46+5:302023-07-20T06:15:04+5:30

देशातील पहिला ‘टॅक्सी वे’ दिल्लीत सुरू

Passenger cars will pass under the plane, saving time; The country's first 'taxi way' | विमानाखालून प्रवाशांची कार जाणार, वेळ वाचणार; देशातील पहिला ‘टॅक्सी वे’

विमानाखालून प्रवाशांची कार जाणार, वेळ वाचणार; देशातील पहिला ‘टॅक्सी वे’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :  : केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत नुकतेच येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौथ्या धावपट्टीचे आणि भारतातील पहिल्या ‘टॅक्सी वे’चे उद्घाटन केले. त्यामुळे विमानतळावरील विमानांची वाहतूक दररोज १५०० वरून २००० पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, विमानांची वेळ आणि इंधनाची बचत होईल.

‘टॅक्सी वे’ विमानांना त्यांच्या पार्किंग थांब्यावरून धावपट्टीवर जाण्यासाठी आणि विमान उतरल्यानंतर परत थांब्यावर जाण्याचा मार्ग आहे. 

वैशिष्ट्ये काय?
nविमानतळाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भागांना हा मार्ग जोडेल आणि तो उंच असल्याने त्याखालून वाहनांची वाहतूक होऊ शकते. 
nयामुळे धावपट्टीवर जाण्याची विमानाची वेळ आठ ते नऊ मिनिटांनी कमी होईल. विशेष म्हणजे विमानांचा तब्बल ७ किलोमीटरचा हेलपाटाही वाचेल.

Web Title: Passenger cars will pass under the plane, saving time; The country's first 'taxi way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.