Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:19 PM2022-05-31T13:19:26+5:302022-05-31T13:30:25+5:30

Indian Railway: रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले

Passengers fought against railways for Rs 35 for 5 years. After the result, now 2.98 Lacks of passengers have benefited | Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

googlenewsNext

नवी दिल्ली - जेव्हा कुणी रेल्वेचं तिकीट बुक करतो तेव्हा पेमेंट गेटवे चार्जपासून सर्व्हिस चार्जपर्यंतचे चार्ज कापले जातात. कोटा येथील राहणारे इंजिनियर सुजीत स्वामी यांनीही पाच वर्षांपूर्वी रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं. मात्र नंतर त्यांनी तिकीट कॅन्सल केलं होतं. रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामींच्या रेल्वेविरोधातील पाच वर्षांच्या लढ्याने सुमारे ३ लाख लोकांना फायदा मिळाला आहे.

स्वामी यांनी रिफंड मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराची मदत घेतली. त्यांनी सांगितले की, सर्व्हिच चार्जचे ३५ रुपये परत मिळवण्यासाठी त्यांना सरकारी विभागाला अनेक पत्रं लिहावी लागली. त्यांनी सुमारे ५० आरटीआय अर्ज फाईल केले. अखेरीस रेल्वेने सर्व्हिस चार्ज म्हणून वसूल केलेले २.४२ कोटी रुपये रिफंड करण्यास मान्यता दिली. हे कोट्यवधी रुपये २.९८ लाख आरटीआय युझर्सच्या माध्यमातून वसूल करण्यात आले होते. यामध्ये अनेक युझर्सनी एकापेक्षा अनेक वेळा तिकीट बुक करून कॅन्सल केले होते.

स्वामी यांनी एप्रिल २०१७ मध्ये कोटा येथून दिल्लीला जाण्यासाटी गोल्डन टेम्पल मेलचं एक तिकीट बुक केले होते. ते २ जुलैच्या प्रवासासाठी होते. त्यानंतर बरोबर एका दिवसापूर्वी म्हणजेच १ जुलैपासून जीएसटी लागू झाला होता. त्यांनी ७६५ रुपयांमध्ये तिकीट बुक केले होते. जेव्हा त्यांनी तिकीट कॅन्सल केले तेव्हा ६५ रुपयांऐवजी १०० रुपये कापून त्यांनी ६६५ रुपयांचा रिफंड मिळाले. मात्र जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट रद्द केले तरी सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते.

आरटीआयच्या माध्यमातून दीर्घकालीन लढाई लढल्यानंतर स्वामी यांना १ मे २०१९ रोजी ३३ रुपयांचे रिफंड मिळाले. तेव्हा सर्व्हिस टॅक्सच्या राऊंडेड ऑफ व्हॅल्यूच्या नावावर २ रुपये कापण्यात आले. त्यानंतर स्वामी यांनी २ रुपयांसाठी पुन्हा लढाई सुरू केली. अखेर गेल्या आठवड्यात त्यांना यश मिळाले. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना २.९८ लाख युझर्सना संपूर्ण ३५ रुपरे रिफंड करण्याची माहिती दिली. तसेच बँक डिटेल्स पाठवल्यावर त्यांना २ रुपये परत मिळाले.  

Web Title: Passengers fought against railways for Rs 35 for 5 years. After the result, now 2.98 Lacks of passengers have benefited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.