वंदे भारत ट्रेनमध्ये आता प्रवाशांना मिळणार स्लीपर कोचची सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:21 PM2023-01-20T16:21:13+5:302023-01-20T16:22:22+5:30

Vande Bharat Express Sleeper Coach Facility : देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे.

passengers will get facility of sleeper coach in vande bharat train | वंदे भारत ट्रेनमध्ये आता प्रवाशांना मिळणार स्लीपर कोचची सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

वंदे भारत ट्रेनमध्ये आता प्रवाशांना मिळणार स्लीपर कोचची सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Next

नवी दिल्ली-

Vande Bharat Express Sleeper Coach Facility : देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान धावणाऱ्या ट्रेनपैकी एक आहे. या सेमी-हाय स्पीड गाड्या आता देशातील महत्त्वाच्या केंद्रांना जोडत आहेत. भारतीय रेल्वेची सेमी-हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रवाशांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनली आहे. आतापर्यंत प्रवाशांना अशा आठ गाड्यांची सुविधा दिली जात होती, मात्र लवकरच प्रवाशांना वंदे भारतमध्ये स्लीपर कोचचीही सुविधा मिळू लागेल. वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन २२० किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्यासाठी डिझाइन केले जाईल. त्यानंतर प्रवासी वंदे भारतच्या स्लीपर व्हर्जन ट्रेनमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता वंदे भारत ट्रेनची स्लीपर आवृत्ती २२० किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्यासाठी डिझाइन केली जाईल. वास्तवात अॅल्युमिनियम-निर्मित स्लीपर आवृत्ती ट्रेन ट्रॅकवर २०० किमी प्रतितास वेगाने धावतील. ते म्हणाले की चेअर कार वंदे भारत एक्सप्रेस गाड्या टप्प्याटप्प्याने शताब्दी एक्सप्रेसने बदलल्या जातील, तर स्लीपर आवृत्ती राजधानी एक्सप्रेस गाड्यांना पर्याय असेल.

दोन टप्प्यात ४०० वंदे भारत गाड्या

  • अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात रेल्वेने ४०० वंदे भारत गाड्यांसाठी रिलीझ जारी केले असून या महिन्याच्या अखेरीस या कामाला मंजुरी मिळेल.
  • वंदे भारत स्लीपर व्हर्जन ट्रेन बनवण्यासाठी चार मोठ्या देशी-विदेशी कंपन्या पुढे आल्या आहेत.
  • योजनेनुसार, पहिल्या २०० वंदे भारत गाड्यांमध्ये शताब्दी एक्स्प्रेस-शैलीतील आसनव्यवस्था असेल आणि त्या १८० किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्यासाठी डिझाइन केल्या जातील.
  • रेल्वे ट्रॅकची अपुरी सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांचा वेग ताशी 130 किमीपर्यंत मर्यादित ठेवला जाईल. या गाड्या स्टीलच्या असतील.


ट्रेन किती वेगाने धावणार ते जाणून घ्या
दुसऱ्या टप्प्यात २०० वंदे भारत ट्रेन स्लीपर असतील आणि त्या अॅल्युमिनियमच्या असतील. ज्या जास्तीत जास्त २०० किमी प्रतितास वेगाने धावतील. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, यासाठी दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता रेल्वेच्या ट्रॅकची दुरुस्ती केली जात आहे, सिग्नल यंत्रणा, पूल निश्चित केले जात आहेत आणि कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. जे लवकरच पूर्ण होईल.

याशिवाय दोन्ही रेल्वे मार्गांवर १८०० कोटी रुपये खर्चून अपघात विरोधी तांत्रिक कवच बसवण्यात येत आहे. त्यामुळे अपघात कमी होतील. पुढील दोन वर्षात तामिळनाडूमधील चेन्नई येथे ICF, महाराष्ट्रातील लातूर रेल्वे कारखाना आणि हरियाणातील सोनीपत येथे ४०० गाड्यांचे उत्पादन केले जाईल.

Web Title: passengers will get facility of sleeper coach in vande bharat train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.