यापुढे आधी मिळेल पासपोर्ट; पोलिसांकडून शहानिशा नंतर
By admin | Published: January 27, 2016 09:20 PM2016-01-27T21:20:20+5:302016-01-27T21:20:20+5:30
पासपोर्ट मिळविण्याआधी पोलिसांकडून पार पाडल्या जाणाऱ्या शहानिशेची किचकट प्रक्रिया यापुढे संपविली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - पासपोर्ट मिळविण्याआधी पोलिसांकडून पार पाडल्या जाणाऱ्या शहानिशेची किचकट प्रक्रिया यापुढे संपविली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. यापुढे सर्वसाधारण श्रेणीत पहिल्यांदाच पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना आधी पोलिसांकडून शहानिशा पार पाडण्याची गरज उरणार नाही. एकदा पासपोर्ट हाती पडल्यानंतरही त्यांना ते करता येऊ शकते.
पासपोर्ट मिळविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा त्यामागे उद्देश आहे. अर्जदाराला आधार, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड देणे गरजेचे राहील. या अर्जाला जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे जाहीर करावे लागेल. पोलिसांकडून नंतर होणाऱ्या शहानिशेच्या आधारावर ही प्रक्रिया निर्भर राहील.
ऑनलाईन प्रक्रियेत आधार क्रमांक वैध असणे मात्र बंधनकारक असेल. अर्जदाराने नवा पासपोर्ट मिळविल्यानंतर पोलिसांकडून होणारी शहानिशेची प्रक्रिया जलदरीतीने पार पाडता यावी यासाठी ‘एम पासपोर्ट पोलीस अॅप’चा अवलंब करण्यात येत आहे