शौचालय नसेल तर मिळणार नाही पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसन्स!
By admin | Published: October 18, 2016 06:10 PM2016-10-18T18:10:23+5:302016-10-18T19:40:07+5:30
पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानानुसार देशभरात शौचालय बांधण्याचं काम जोरात सुरू आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात शौचालयाचा वापर करावा यासाठी
Next
>ऑनलाइन लोकमत
कटनी, दि. 18 - पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानानुसार देशभरात शौचालयं बांधण्याचं काम जोरात सुरू आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात शौचालयाचा वापर करावा यासाठी मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यात पोलीस एक आगळा-वेगळा प्रयोग करत आहेत. याद्वारे ज्याच्या घरामध्ये शौचालय असेल त्यांनाच केवळ पारपत्र (पासपोर्ट) आणि परवाना देण्यात येणार आहे.
कटनी जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक गौरव तिवारी यांनी नागरिकांनी जास्त प्रमाणात शौचालय बांधावे यासाठी हा प्रयोग सुरू केला आहे. त्यांनी पोलिसांना तसा आदेशच दिला आहे. पासपोर्ट पडताळणी, वाहन परवाना, शस्त्र परवाना आदी प्रमाणपत्र देताना संबंधित व्यक्तिच्या घरात शौचालय आहे की नाही याची पडताळणी करावी नंतरच प्रमाणपत्र द्यावं, आणि जर घरात शौचालय नसेल तर पासपोर्ट, वाहन परवाना आदी प्रमाणपत्र त्याला देऊ नये, असा हा आदेश आहे.
गौरव तिवारी यांच्यानुसार या निर्णयामुळे उघड्यावर शौचास बसण्यावर आळा बसेल आणि नागरिकांमध्ये जागरूकता येईल, तसेच परिसर आपसुकच स्वच्छ होईल.