Passport Apply : पोस्‍ट ऑफिसद्वारे झटपट बनवता येणार पासपोर्ट! जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:14 PM2022-09-28T16:14:31+5:302022-09-28T16:14:59+5:30

Passport Apply :. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज (Passport Apply in Post Office) करू शकता.

passport through post office know how to apply for passport at nearby post office | Passport Apply : पोस्‍ट ऑफिसद्वारे झटपट बनवता येणार पासपोर्ट! जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...

Passport Apply : पोस्‍ट ऑफिसद्वारे झटपट बनवता येणार पासपोर्ट! जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...

Next

नवी दिल्ली : दरवर्षी भारतातून लाखो लोक परदेशात फिरायला किंवा नोकरीसाठी जातात. जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पासपोर्टची गरज भासते. परराष्ट्र मंत्रालयाकडून (Ministry of External Affairs) पासपोर्ट जारी केला जातो. यासाठी मंत्रालयाने अनेक पासपोर्ट सेवा केंद्रे स्थापन (Passport Seva Kendra) केली आहेत.

साधारणपणे असे म्हटले जाते की, पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया खूप लांब आणि किचकट असते. अनेक वेळा पासपोर्ट कोठून आणि कसा मिळवावा हे लोकांना समजत नाही. तुम्हीही येत्या काही दिवसांत पासपोर्ट (Passport) बनवणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता पासपोर्ट सेवा केंद्राच्या शोधात इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज (Passport Apply in Post Office) करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (Common Service Centre) पासपोर्ट बनवण्याची सुविधा मिळते. मात्र, पोस्ट ऑफिस लोकांना पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी थेट कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला देते. या अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही या रिसिटची प्रिंटआउट घ्या. 

यानंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जा. तेथे नागरिकांना अर्ज आणि कागदपत्रे नीट तपासावी लागतील, त्यानंतर पासपोर्ट अर्जाची प्रक्रिया पुढे जाईल. जर तुम्हाला पासपोर्टच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल (Passport Application Process)देखील जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती देत ​​आहोत.

पासपोर्टसाठी अशाप्रकारे ऑनलाइन करा अर्ज... 
- यासाठी तुम्ही पासपोर्टच्या अधिकृत वेबसाइट passportindia.gov.in ला भेट देऊ शकता. 
- जर तुम्ही User ID आणि Password तयार केला असेल तर तो टाकून लॉगिन करा, अन्यथा User ID आणि Password तयार करा.
- Registration साठी सर्वात आधी New User वर क्लिक करा आणि आता Register Now चा ऑप्शन निवडा.
- त्यानंतर User ID आणि Password तयार करून Captcha Code टाका.
- यानंतर Registration प्रक्रिया पूर्ण होईल.
- पुढे, तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला जवळच्या पासपोर्ट ऑफिसचे डिटेल्स, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि लॉगिन आयडी यासारखी सर्व माहिती भरायची आहे.
- यानंतर Save ऑप्शनवर क्लिक करून माहिती सेव्ह करा.
- लक्षात ठेवा की, यामध्ये देण्यात आलेली माहिती योग्य असणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे फॉर्म रिजेक्ट केला जाईल.
- आता यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला (जेथे पासपोर्ट सेवा केंद्र बनवले आहे) भेट द्यावी लागेल.
- तुमच्यासोबत, तुम्ही तुमच्या फॉर्मची रिसिट आणि मागितलेली सर्व मूळ कागदपत्रेही ठेवावीत.
- त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये पडताळणी आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- यानंतर, पोलीस पडताळणीनंतर, तुमचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केला जाईल.

पासपोर्ट मिळविण्यासाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक...
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- व्होटर आयडी कार्ड (Voter ID Card)
- ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
- विज किंवा पाणी बिल
- रेशन कार्ड (Ration Card)
- बँक पासबुक (Bank Passbook)

Web Title: passport through post office know how to apply for passport at nearby post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.