पासपोर्ट मिळणार अकरा दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:25 AM2019-07-11T05:25:08+5:302019-07-11T05:25:11+5:30

केंद्राची घोषणा; भ्रष्टाचारालाही आळा बसणार, देशात ३६ कार्यालये

Passport will be available in eleven days | पासपोर्ट मिळणार अकरा दिवसांत

पासपोर्ट मिळणार अकरा दिवसांत

Next

नवी दिल्ली : आता अर्ज केल्यानंतर अकरा दिवसांत पासपोर्ट जारी केला जाईल. ही घोषणा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी लोकसभेत केली.
यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासांत पुरवणी प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना व्ही. मुरलीधरन म्हणाले की, ‘तात्काळ’ योजनेद्वारे अर्ज केलेल्यांना मात्र पासपोर्ट खूपच कमी दिवसांत दिला जाईल.
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची पोलिसांकडून शहानिशा केली जाते. त्यासाठी एक अ‍ॅप्लिकेशन ७३१ पोलीस जिल्ह्यांमध्ये वापरण्यात येत आहे. त्याद्वारे अर्जदाराची कमी वेळेत तपासणी करणे अधिक सुलभ होणार आहे, तसेच त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल.
पासपोर्टची प्रक्रिया आॅनलाईन झाली असली तरी तो मिळेपर्यंत काही टप्प्यांवर अजूनही भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारकडे करण्यात आल्या होत्या. कधीकधी पोलिसांकडून होणाºया तपासणीत दिरंगाई होते. अशा काही कारणांमुळे अर्ज केल्यापासून पासपोर्ट मिळण्यास वीस-पंचवीस दिवस लागत असल्याचीही उदाहरणे आहेत.

खासगी कंपन्यांचा सहभाग नाही
पासपोर्ट मिळण्यासाठी लोकांना अनेक अडचणींचा सामना का करावा लागतो असा सवाल काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी विचारला होता.
त्यावर व्ही. मुरलीधरन म्हणाले की, देशामध्ये ३६ पासपोर्ट कार्यालयांशिवाय ९३ पासपोर्ट सेवाकेंद्रे, ४१२ टपाल कार्यालयांतील पासपोर्ट सेवा केंद्रे कार्यरत आहेत. आणखी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, टपाल कार्यालयांतील पासपोर्ट सेवा केंद्रे खासगी कंपनीमार्फत चालविली जात नाहीत.

Web Title: Passport will be available in eleven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.