पोलीस तपासणीशिवाय मिळू शकणार पासपोर्ट, लवकरच नवा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 06:15 AM2018-07-31T06:15:48+5:302018-07-31T06:15:59+5:30
पासपोर्ट मिळण्यात सर्वाधिक विलंब होतो तो पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे, पण पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पासपोर्ट मिळण्यात सर्वाधिक विलंब होतो तो पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे, पण पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील. इतर प्रकरणात त्यांना अर्जदाराच्या घरी जाण्याची गरजच भासणार नाही. यासाठी पासपोर्ट विभाग सर्व राज्यांच्या पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती मिळण्यासाठी चर्चा करीत आहे. त्यामुळे ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यास लवकर पासपोर्ट मिळू शकेल.
अर्ज करणाºयास एक ते तीन दिवसांत पासपोर्ट मिळावा, असे विभागाचे प्रयत्न आहेत. सध्या आधार क्रमांक देणाºयास पासपोर्ट दिल्यानंतरही तपासणी केली जाते, पण राज्यांकडील गुन्ह्यांच्या माहितीद्वारेच अर्जदाराच्या थेट तपासणीचा प्रयत्न पासपोर्ट विभाग करीत आहे. शेजाºयाकडे जाऊन अर्जदाराची माहिती मिळविणे वा अर्जदार एकाच पत्त्यावर तीन वर्षे राहतो आहे का, हे पाहणे हे नियम शिथिल केले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात एक सेवा केंद्र
परराष्ट्र मंत्रालयातील
सचिव (पासपोर्ट सेवा) ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, शेजाºयाकडे जाऊन चौकशी करून घेणे, पोलीस कर्मचाºयाने घरी जाऊन माहिती मिळविणे हे प्रकार आम्हाला रद्द करायचे आहेत. ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही, त्याच्या माहितीची गरजच असू नये. प्रत्येक जिल्ह्यात किमान पासपोर्ट सेवा केंद्र असावे, असे प्रयत्न असून, तोपर्यंत पाहिजे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक पासपोर्ट सेवा केंद्र स्थापणे हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: देखरेख करीत आहेत व त्याच्याशी संबंधित माहिती मिळवित आहेत. यामुळे काम वेगाने पुढे सरकत आहे.