आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यास तयार - नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 10:59 AM2018-11-01T10:59:02+5:302018-11-01T12:12:46+5:30
निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या अधिकारांची, हक्कांची पूर्तता करण्याची आठवण होते. मुलभूत सोयीसुविधा, स्मारकं, राम मंदिर, विविध समाजाचे आरक्षण यांसहीत अनेक मुद्दे चर्चेत येतात.
पाटणा - निवडणुका जवळ आल्या की सर्वच राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांच्या अधिकारांची, हक्कांची पूर्तता करण्याची आठवण होते. मुलभूत सोयीसुविधा, स्मारकं, राम मंदिर, विविध समाजाचे आरक्षण यांसहीत अनेक मुद्दे चर्चेत येतात. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनीही आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. 'अनुसूचित जाती जमाती (एससी/एसटी)चे आरक्षण करण्याची ताकद कोणामध्येही नाहीय', असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. जदयूनं आयोजित केलेल्या मगध प्रमंडलीय दलित-महादलित कार्यकर्ता संमेलनात संबोधित करताना नितीश कुमार यांनी हे विधान केले आहे.
पुढे ते म्हणाले की, न्याय आणि विकासाप्रती आमची वचनबद्धता आहे. न्यायासोबत विकास म्हणजे समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विकास. देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण रद्द करण्याची ताकद कोणातही नाहीय. शिवाय, आरक्षणासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत.
नितीश कुमार यांनी असेही म्हटले की, काही जण काम न करता आणि तत्त्वांप्रती निष्ठा न राखता राजकारणात प्रवेश करतात आणि अधिकार मिळाल्यानंतर त्यांचा दुरुपयोग करतात. काही जण समाजात भ्रम पसरवण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आरक्षण मिळालेच नाही तर मागासलेला समाज मुख्य प्रवाहात कसा येईल. जोपर्यंत मागासलेल्यांचा विकास होत नाही. तोपर्यंत समाज, राज्य तसंच देशाचा विकास होऊ शकत नाही.