पतंजली तुपात बुरशी?
By admin | Published: December 30, 2015 03:47 AM2015-12-30T03:47:13+5:302015-12-30T03:47:13+5:30
बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली संस्थानतर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या देशी तुपात बुरशी आढळून आल्यानंतर, अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पतंजलीच्या
डेहराडून : बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली संस्थानतर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या देशी तुपात बुरशी आढळून आल्यानंतर, अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पतंजलीच्या तुपाचे नमुने गोळा केले. हरिद्वारमधील नागरिकांनी पतंजलीच्या देशी तुपाच्या बाटलीत बुरशी आढळल्याची तक्रार केली होती. या देशी तुपाचे नमुने पुढील चाचणीसाठी रुद्रपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
‘पतंजलीच्या देशी तुपात बुरशी असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्यानंतर, आम्ही भद्राबाद येथून या तुपाचे काही नमुने गोळा केले. हे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. चाचणी अहवाल १५ दिवसांत येईल, अशी अपेक्षा आहे. या शिवाय ९ डिसेंबरला पतंजली नूडल्सचे नमुनेही चाचणीसाठी पाठविण्यात आले होते आणि त्याच्या अहवालाचीही विभागाला प्रतीक्षा आहे, असे हरिद्वार येथील अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी महिमानंद जोशी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)