बीएसएफचे जवान वापरणार पतंजलीची उत्पादने
By admin | Published: February 16, 2017 03:34 PM2017-02-16T15:34:03+5:302017-02-16T15:34:03+5:30
योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीची उत्पादने आता सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ)जवान वापरणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीची उत्पादने आता सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान वापरणार आहेत.
राजधानी दिल्लीत बाबा रामदेव यांच्या एफएमसीसी कंपनी पंतजलीच्या पहिल्या दुकानाचे गुरुवारी उद्धाटन करण्यात आले. यावेळी पतजंली आणि बीएसएफच्या बीडब्ल्यूडब्ल्यूएमध्ये एक करार करण्यात आला असून पतजंली उत्पादनांची दुकाने भारतातील सर्व बीएसएफच्या कॅम्पमध्ये उघडली जाणार आहेत.
दरम्यान, यासंदर्भात बीएसएफकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये बीएसएफचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना पतजंलीच्या दुकानातील वेगवेगळ्या उत्पादनांवर 15 ते 28 टक्के सवलत देण्यात येणार आहे. याचबरोबर दिल्लीनंतर आता भारतातील आगरतळा, तेकनपूर, गुवाहटी, जोधपूर, कोलकाता, जम्मू, बंगळुरु, सिलचार, अहमदाबाद. हझारीबाग आणि इंदोर येथील बीएसएफच्या कॅम्पमध्ये पतंजलीच्या उत्पादनांची दुकाने उघडली जाणार आहेत.