पतंजलीची उत्पादनं गुणवत्ता चाचणीत फेल

By admin | Published: May 30, 2017 10:01 AM2017-05-30T10:01:18+5:302017-05-30T10:30:50+5:30

योग गुरू बाबा रामदेव यांची कंपनी "पंतजली"ची अनेक उत्पादनं उत्तराखंडमधील एका प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत.

Patanjali's product quality test failed | पतंजलीची उत्पादनं गुणवत्ता चाचणीत फेल

पतंजलीची उत्पादनं गुणवत्ता चाचणीत फेल

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - योग गुरू बाबा रामदेव यांची कंपनी "पंतजली"ची अनेक उत्पादनं उत्तराखंडमधील एका प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहेत. "हिंदुस्तान टाइम्स"नं दिलेल्या वृत्तानुसार, माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) मिळालेल्या उत्तरातून ही धक्कदायक बाब समोर आली आहे. यानुसार, हरिद्वारमधील आयुर्वेद आणि युनानी कार्यालयात पतंजलीसह 40 टक्के आयुर्वेद उत्पादनांची चाचणी करण्यात आली. मात्र या उत्पादनांची गुणवत्ता मानकांप्रमाणे आढळून आली नाहीत. 
 
वर्ष 2013 ते 2016 दरम्यान गोळा करण्यात आलेल्या 82 नमुन्यांपैकी 32 उत्पादनं गुणवत्ता चाचणीत पास होण्यास अपयशी ठरलेत.  पतंजलीचे "दिव्य आवळा ज्यूस" आणि "शिवलिंगी बीज" या उत्पादनांचाही यात समावेश आहे, ज्यांची गुणवत्ता मानकांनुसार आढळून आलेली नाही. दरम्यान, गेल्या महिन्यात सैनिकांच्या कॅन्टीनमध्येही पतंजलीचा आवळा ज्यूसवर बंदी लावण्यात आली होती.  सेनेकडून करण्यात आलेली ही कारवाई पश्चिम बंगालच्या आरोग्य प्रयोगशाळाद्वारे करण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणीत पतंजलीची उत्पादनं फेल झाल्यानंतर करण्यात आली होती. 
 
उत्तराखंड सरकारच्या प्रयोगशाळेतील अहवालानुसार, आवळा ज्यूसमध्ये प्रमाणापेक्षा कमी पीएचची मात्रा आढळून आली. पीएचची मात्रा 7 हून कमी असल्यास अॅसिडिटी आणि आरोग्याशी संबंधित अन्य समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाबदेखील समोर आली की शिवलिंगी बीजमधील 31.68 टक्के भाग हा परदेशी होता. 
 
दरम्यान, रामदेव यांचे सहयोगी आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी प्रयोगशाळेतील अहवाल फेटाळून लावला आहे.  ""शिवलिंगी बीज एक नैसर्गिक बीज आहे. आम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारे कशी छेडछाड करू शकतो?"". असा प्रश्न उपस्थित करत,  ""हा अहवाल म्हणजे पतंजलीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे"", असा दावाही त्यांनी केला आहे. 
 

Web Title: Patanjali's product quality test failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.