पटेल यांच्या पुतळ्याचे ३१ आॅक्टोबरला अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:56 AM2018-09-11T04:56:23+5:302018-09-11T04:56:32+5:30
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली.
नवी दिल्ली : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना रुपानी म्हणाले की, १८२ मीटर उंचीचा हा पुतळा देशाच्या एकता, अखंडतेचे प्रतीक असणार आहे. भारतीय जनता पार्टीने हा भव्य पुतळा उभारण्यासाठी देशभरातून लोखंड, माती आणि पाणी एकत्र केले होते. नरेंद्र मोदी हे २०१३ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही घोषणा केली
होती.