पठाणकोट हल्ला - उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची नवाझ शरीफ यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 02:36 PM2016-01-11T14:36:45+5:302016-01-11T16:10:58+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ११ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी भारताने केली त्याची सांगड १५ जानेवारी रोजी प्रस्तावित असलेल्या सचिवस्तरीय चर्चेशी जोडली, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारत पाकिस्तानमध्ये सचिवस्तरीय बोलणी होणार नाहीत असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला होता.
पठाणकोट हल्ल्याशी सबंधित असल्यावरुन पाकिस्तानमध्ये काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.
या हल्ल्याच्या मूळाशी जाण्याचा शरीफ यांचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानमधल्या एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
२ जानेवारी रोजी हवाई दलाच्या तळावर झालेल्या या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.